एक्स्प्लोर

अजित पवार गटाची सुप्रीम कोर्टात मोठी चाल, थोरले पवार आणि ठाकरे दोघेही अडचणीत?

Maharashtra Politics: अजित पवार गटानं एक मोठी खेळी खेळत सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या अडचणी वाढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

Intervention Petition of Ajit Pawar Group: नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) आमदारांना अपात्र ठरवण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे. याप्रकरणी अजित पवार गटानं (Ajit Pawar Group) हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. कारवाईत घाईत करण्याची गरज नाही, असा उल्लेख अजित पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. 

विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेत नाहीत, त्यांना तातडीनं निर्णय घ्यायला सांगा, असं म्हणत केवळ एक पक्ष नव्हे तर महाराष्ट्रातल्या दोन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं आहे. या दोन्ही पक्षांची याचिका सर्वोच्च न्यायालय एकत्रितपणे ऐकणार आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं आपली रणनीती आखली असून यासंदर्भात तीन हस्तक्षेप याचिका दाखल केल्याची माहिती वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

प्रतोद अनिल पाटील, नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ यांच्या नावे अजित दादा गटाच्या याचिका 

वकिल सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, "राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. प्रतोद अनिल पाटील, नरहरी झिरवळ आणि छगन भुजबळ यांच्या नावे स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या हस्तक्षेप याचिकेतून न्यायालयाला सांगण्यात आलं आहे की, हे प्रकरण निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. अनिल पाटलांनी म्हटलंय की, मी प्रतोद आहे. नरहरी झिरवळ म्हणातयत की, मी उपाध्यक्ष आहे, असं सांगतानाच या प्रकरणात अजिबात घाई करण्याची गरज नाही, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. 

अजित पवार गटानं तीन हस्तक्षेप याचिका का दाखल केल्यात? 

हस्तक्षेप याचिका तीन का करण्यात आल्या? यासंदर्भात विचारल्यावर वकिल सिद्धार्थ शिंदे म्हणाले की, "अजित पवार गटानं ज्या तिघांच्या वतीनं तीन वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत, त्या तिघांची नावं महत्त्वाची आहेत. मंत्री छगन भुजबळ, प्रतोद अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ... तसेच तीन याचिकांमुळे तीन वेगवेगळ्या वकिलांना परवानगी मिळणार असून त्यामुळे तीन वेगवेगळे मुद्दे न्यायालयासमोर मांडता येणार आहेत. पण, यात महत्त्वाची बाब म्हणजे, अजित पवार गटानं दाखल केलेल्या याचिका स्विकारायच्या की नाही, यासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार आहे. आज दोन्ही प्रकरणावर सुनावणी आहे. तसेच, आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, पात्रता-अपात्रता यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय कोणताही निर्णय घेणार नाही, यासंदर्भातील निर्णय केवळ विधानसभा अध्यक्षच घेऊ शकणार आहेत. फक्त अध्यक्षांना निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे." 

"माध्यमांमधून आपण पाहतोय की, विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता सुनावणीसाठी रुपरेषा ठरवली, वेळापत्रक ठरवलं या सर्व गोष्टींसंदर्भात अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला कळवलं आहे, असं बऱ्याच जणांना वाटलं असेल, अद्याप अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाला कळवलेलं नाही, आज त्यांचे वकील तुषार मेहता हे अध्यक्षांची रुपरेषा सर्वोच्च न्यायालयाला कळवणार आहेत.", असंही सिद्धार्थ शिंदे म्हणाले. 

पाहा व्हिडीओ : Siddharth Shinde: विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीसाठी तयार केलेलं वेळापत्रक अजून कोर्टात नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget