सुनील टिंगरे, संग्राम जगताप ते अण्णा बनसोडे, धनंजय मुंडे, अजित पवारांकडे किती आमदार, शरद पवारांच्या आमदारांची संख्या किती?
लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळेच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता वाढली आहे.
मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackerya) यांची शिवसेना (Shivsena) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने (NCP) या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारल्यानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांत अस्वस्थता असल्याचे म्हटले जात आहे. ही चर्चा चालू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी सर्व आमदारांची मुंबईत हॉटेल ट्रायडन्ट येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक संध्याकाळी होणार असून तिला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
अजित पवार यांनी बोलावली आमदारांची महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहता अजित पवारांच्या आमदारांमध्ये सध्या धाकधूक आहे. अजित पवार यांच्या आमदारांनी आपल्या कार्यकर्त्यांना महायुतीचं काम करा असं सांगूनदेखील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने आमदारांमध्ये संभ्रमाची भावना आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं वाढतं महत्त्व पाहता अजित पवारांच्या
आमदारांकडून पुन्हा एकदा विधानसभा मतदारसंघातील जनमताचा कौल घेतला जाणार आहे, असं म्हटलं जातंय. जनतेमध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, संविधान बदलया बाबी अधिक प्रमाणत रूजल्यामुळे जनतेशी कनेक्ट होण्यात अडचणी येत असल्याची आमदारांची भावना आहे. त्या अनुषंगाने आता अजित पवार यांच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्रायडन्टमध्ये बैठक होत आहे.
अजित पवार यांच्या गटात किती आमदार?
1.सरोज अहिरे
2.धर्माबाबा आत्राम
3.बाळासाहेब अजबे
4.राजू कारेमोरे
5.आशुतोष काळे
6.माणिकराव कोकाटे
7.मनोहर चांद्रिकेपुरे
8.दीपक चव्हाण
9.संग्राम जगताप
10.मकरंद पाटील
11.नरहरी झिरवाळ
12.सुनील टिंगरे
13.अदिती तटकरे
14.चेतन तुपे
15.दौलत दरोडा
16.राजू नवघरे
17.इंद्रनील नाईक
18.मानसिंग नाईक
19.शेखर निकम
20.अजित पवार
21.नितीन पवार
22.बाबासाहेब पाटील
23.अनिल पाटील
24.राजेश पाटील
25.दिलीप बनकर
26.अण्णा बनसोडे
27.संजय बनसोडे
28.अतुल बेनके
29.दत्तात्रय भरणे
30.छगन भुजबळ
31.यशवंत माने
32.धनंजय मुंडे
33.हसन मुश्रीफ
34.दिलीप मोहिते
35.किरण लहामटे
36.दिलीप वळसे
37.राजेंद्र शिंगणे
38.बबनराव शिंदे
39.सुनील शेळके
40.प्रकाश सोळंके
शरद पवार यांच्या गटात किती आमदार?
शरद पवार यांच्या गटातील आमदार
1.अशोक पवार
2.रोहित पवार
3.अनिल देशमुख
4.जितेंद्र आव्हाड
5.प्राजक्ता तनपुरे
6.जयंत पाटील
7.संदीप क्षीरसागर
8.सुमन पाटील
9.राजेश टोपे
10.सुनील भुसारा
हेही वाचा :
लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त