एक्स्प्लोर

लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ, 36 मतदारसंघात डिपॉझिट जप्त

Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ ठरला आहे. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाले आहे.

Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात 'वंचित फॅक्टर' निष्प्रभ ठरला आहे. वंचितने अधिकृत लढवलेल्या 38 जागांवर पक्षाला फक्त 15 लाख 66 हजार 949 मतदान मिळाले आहे. अकोला आणि हिंगोली हे दोन मतदारंघ वगळता इतर 36 मतदारसंघात वचिंतच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झाले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांचा दारूण पराभव झाला.  2,76,747 मतांसह प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. 

अकोला आणि हिंगोली वगळता सर्वच ठिकाणी वंचितला लाखाच्या खाली मतदान मिळाले. प्रकाश आंबेडकरांकडे हक्काच्या दलित, ओबीसी आणि मायक्रो मायनॉरिटीज समुदायाने पाठ फिरवल्याचे चित्र दिसतेय. राज्यात फक्त अकोला आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीला वंचितचा फटका बसला. 2019 मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला वंचितमूळे जवळपास 15 मतदारसंघात फटका बसला होता. लोकसभेत अनेक ठिकाणी वंचितमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी ऐनवेळी उमेदवार बदलवलेत. तर काही ठिकाणी उमेदवारांचे अर्ज बाद झाले. 

2019 मध्ये वंचित-एमआयएम' आघाडीने लोकसभा निवडणुकीत राज्यात  41 लाख 32 हजार 446 मते घेतली होती. एमआयएमसोबत छत्रपती संभाजीनगरची जागा जिंकली होती. वचिंतला 2019 मध्ये 14 टक्क्यांच्या आसपास मते मिळाली होती. 2024 मधील सुमार कामगिरीमुळे वंचितच्या पुढच्या राजकीय वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. आंबेडकर महाविकास आघाडीसोबत न गेल्याचा फटका वंचितला बसल्याची चर्चा, सुरु झाली आहे.  

2024 मधील लोकसभेत वंचितची स्थिती.

एकूण लढवलेल्या जागा : 38
मिळालेली मते : 15 लाख 66 हजार 949
इतरांना पाठिंबा दिलेल्या जागा : 07
उमेदवार नसलेल्या जागा : 03

वंचितने निवडणुकीत काय केलं आणि काय मिळवलं? 

वंचित बहुजन आघाडीचा चार जागांवर मविआला फटका बसला. मुंबई उत्तर पश्चिम, अकोला, हातकणंगले आणि बुलढाण्यात वंचितचा फटका बसला. मुंबई उत्तर-पश्चिम मध्ये ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव जिथे वंचितच्या परमेश्वर रणशुर यांना 10052 मते मिळवली. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे यांचा 40626 मतांनी विजय मिळाला. जिथे तिसऱ्या क्रमांकावरील प्रकाश आंबेडकरांना 2,76,748 मते मिळाली. हातकणंगलेत  ठाकरे गटाचे सत्यजीत आबा पाटील यांचा 13,426 मतांनी पराभव जिथे वंचितच्या डी सी पाटील यांना 32,696 मते मिळाली. बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा 29,479 मतांनी पराभव झाला. वंचितच्या वसंतराव मगर यांना 98,441 मते मिळाली. 

माविआत वंचितच्या सहभागाला घेऊन मवीआचे नेते  आग्रही होते. पाच ते सहा जागांची ऑफऱही देण्यात आली होती. पण जागावाटपावरुन बोलणी फिसकटली. वंचितने राज्यात एकूण 35 जागांवर केले होते उमेदवार उभे तर सहा जागांवर माविआला पाठिंबा दिला होता. राज्यात वचिंतला एकही जागा मिळाली नाही. 
 
मात्र प्रत्यक्षात वंचितला या निवडणुकीत हवे तसे यश मिळालेले पाहायला मिळत नाही. वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा पराभव झालाय. प्रकाश आंबेडकरही जास्त मतं घेऊन पराभूत झाले आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.मात्र वंचितच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचा सुफडा साफ झालाय. अनेक ठिकाणी तर वंचितच्या उमेदवारांना 5 ते 10 हजाराचा मतांचा टप्पाही पार करता आला नाहीय. तर काही ठिकाणी मात्र  वंचितच्या उमेदवारीचा इतर उमेदवारांना मोठा फटका बसला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget