Navi Mumbai International Airport : अत्याधुनिक AI तंत्रज्ञान,1 लाख कोटींचा खर्च, उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी तुलना, कसे असेल नवी मुंबई विमानतळ?
Navi Mumbai: अत्याधुनिक AI तंत्रज्ञानसह 1 लाख कोटींचा खर्च करण्यात आलेल्या आणि उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी तुलना करण्यात आलेले नवी मुंबई विमानतळाची नेमकी वैशिष्ट्ये काय हे जाणून घेऊ.

Navi Mumbai Airport : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) उद्घाटन होणार आहे. अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी यांनी नुकतेच या सुविधेच्या अंतिम तयारीचा आढावा घेतला. अतिशय महत्वाकांक्षी अशा या विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) उद्घाटनानंतर लवकरच या विमानतळावरून आंतरराष्टीय उड्डाणे सुरू होणार आहेत, ज्यामध्ये दरवर्षी 9 कोटी प्रवाशांना सेवा देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. या संदर्भातला प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, अत्याधुनिक AI तंत्रज्ञानसह 1 लाख कोटींचा खर्च करण्यात आलेल्या आणि उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी तुलना करण्यात आलेले नवी मुंबई विमानतळाची नेमकी वैशिष्ट्ये काय हे जाणून घेऊ.
Navi Mumbai Airport : कसे असेल नवी मुंबई विमानतळ?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी उदघाटन होणार असले तरी प्रत्यक्षात डिसेंबर महिन्यात विनानसेवा सुरू होईल. देशपातळीवरील , आंतरराष्ट्रीय आणि कार्गो सेवा डिसेंबरमध्येच सुरू होईल.
- विमानतळ उभारणीस एकूण खर्च 1 लाख करोड येणार आहे. एकूण 1160 हेक्टर वर विमानतळ उभारले जाणार आहे.
- एकूण चार टप्यात विमानतळ उभा राहील.
- या विमानतळावर दोन रनवे आहेत.
- जगातील सर्वात मोठ्या लंडन येथील हिर्थो विमानतळाशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची तुलना करण्यात येत आहे.
- नवी मुंबई विमानतळ ते मुंबंई विमानतळ मेट्रो सेवेने जोडणार.
- मुंबई , ठाणे , नवी मुंबई , कल्याण डोंबिवली कोस्टल रोडने विमानतळाशी जोडणार .
- पहिले विमानतळ असेल ज्याला वॅाटर टॅक्सीने जोडले जाणार.
- आंतरर्गत सर्व टर्मिनल एकमेकांना जोडले जाणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी एकात्मिक प्रणाली तयार केली आहे.
- विमानतळ पर्यावरणपूरक (Eco-friendly) असेल, हरित उर्जेचा वापर आणि जलसंधारण यावर विशेष भर.
- कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची असून, अटल सेतू ते कोष्ठल रोड तयार होणार आहे.
- संपूर्ण प्रकल्प चार वर्षांत पूर्ण होणार आहे.
- प्रवाशांसाठी “वन-अप एंड टू एंड बॅगेज फॅसिलिटी” ऍपमार्फत उपलब्ध होईल.
- टर्मिनलमध्ये डिजिटल आर्टच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा उपयोग विविध ऑपरेशनमध्ये केला जाणार आहे.
- विमानतळावर 350 एअरक्राफ्ट पार्किंगची सुविधा असेल.
- या प्रकल्पाचा आत्ता पर्यंतचा खर्च एकूण खर्च ₹19,600 कोटी रुपये झाला आहे.
- दोन रनवेसाठी स्वतंत्र टॅक्सीवे तयार केले आहेत.
- लँड डेव्हलपमेंटसाठी सिडकोने ₹3,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.
Navi Mumbai Airport Naming : दिबा पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्र्यांची घोषणा
नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत माहिती दिली. या संदर्भातला प्रस्ताव पंतप्रधान मोदींकडे पाठवण्यात आला होता आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या नामकरणासाठी लवकरच मान्यता मिळेल. नामकरणावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे खासदार बाळामांबा म्हात्रे यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. दिबा पाटलांच्या नावासाठी अनेक वर्षांपासून मागणी होती. या निर्णयामुळे स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करण्यात आला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे भविष्यातील प्रकल्पांच्या नामकरणासाठी एक दिशा मिळाली आहे.
आणखी वाचा























