Beed News: वाल्मिक कराडला मकोका, परळीत दुसऱ्या दिवशीही तणाव; अण्णांसाठी तरुण मोबाईल टॉवरवर चढला
Parli News : वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा लावल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी आज सलग दुसऱ्या दिवशीही परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नसल्याचे बघायला मिळाले आहे.
Parli Closed News बीड: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला. केज सत्र न्यायालयातील वाल्मिक कराड याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटाच्या सहभागात संशयित म्हणून वाल्मिक कराडवर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज वाल्मिक कराडला पुन्हा बीड जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडवर मकोका (Walmik Karad Mcoca)गुन्हा लावल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी आज सलग दुसऱ्या दिवशीही परळी बंदची हाक दिली आहे. परळी शहरातील अनेक दुकानं आजही उघडली नाहीत. शिरसाळा आणि धार्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड यांच्यावर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जात आहे. काल वाल्मीक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळी शहरांमध्ये बाजारपेठ बंद झाली होती. आज परळी बंद असा कोणताही आव्हान करण्यात आले नव्हते तरीही परळी शहरातील काही भागातील दुकाने आताही बंद असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कराड समर्थकाचे मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन
दुसरीकडे कराड समर्थकांनी आज पुन्हा मोबाईलच्या टावरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मारोती मुंडे या युवकाने गेल्या एक तासापासून टावरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. कराड याच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी या युवकाकडून केली जात आहे. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशाराही या युवकाने दिला आहे.
SIT ची समिती आता गती घेत आहे - धनंजय देशमुख
"परळीतील लोकांना काय उत्तर द्यायचं हे प्रशासनाचे काम आहे. ते उत्तर देतील," असेही कराड कुटुंबीयांनी सांगितले. एसआयटी संदर्भात कराड कुटुंबीयांनी जे आक्षेप घेतले, त्या संदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे ते म्हणाले."ज्यावेळी आरोप केले होते, त्यावेळी सर्व समाजाचे म्हणणे होते की ज्यांचे फोटो आरोपांसोबत आहेत, ते काय न्याय देतील? म्हणून आम्ही नव्याने समिती गठित करण्याची मागणी केली होती. ती समिती आता गती घेत आहे," असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, "आम्ही न्याय मागत आहोत आणि तपास योग्य दिशेने व्हावा, हीच आमची मागणी आहे." अशी प्रतिक्रिया संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या