एक्स्प्लोर

लोकांचा आक्षेप आकाच्या आकावर, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या 'त्या' कृतीला अर्थ नाही : संजय राऊत

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी मोदींनी आरोप केलेले अजित पवार, अशोक चव्हाण बैठकीला असतील तर धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का असं म्हटलंय.

मुंबई :  खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा, धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी, वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला मकोका, कायदा सुव्यवस्था मुद्यांवर भाष्य केलं. ते  मुंबईच्या विकासासाठी प्रधानमंत्री येत असतील तर स्वागत आहे, अदानीच्या विकासासाठी नाही, मुंबईच्या विकासासाठी येत असतील तर,  धारावीचा प्रश्न अजून प्रलंबित आहे असं संजय राऊत म्हणाले.   प्रधानमंत्री मणिपूरमध्ये कधी जाणार आहेत हा देखील प्रश्न आहे, दिल्ली निवडणुका झाल्या की त्यांनी मणिपूरमध्ये जावे.  याशिवाय अजित पवार, अशोक चव्हाण यांना एक न्याय आणि धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का लावण्यात आला, असा सवाल राऊत यांनी केला. 

संजय राऊत काय म्हणाले? 

पतंप्रधान कुणाला भेटणार आहेत, महायुतीच्या आमदारांना भेटणार आहेत, त्यांनीच निवडून आणलंय.  महायुतीच्या बैठकीत आज इ व्ही एम चे मशिन ठेवले पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. महापुरुषांचे फोटो ठेवण्यापेक्षा ते मशीन ठेवावे, नोटांची बंडलं ठेवली पाहिजेत. मग या विजयाचे शिल्पकार मंचावर येतील, असं संजय राऊत म्हणाले. 

धनंजय मुंडे यांना दूर ठेवण्यात आले आहे की नाही माहीत नाही, पण अजित पवार, हसन मुश्रीफ असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केले.  अजित पवारांवर 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करतात, अशोक चव्हाणांवर आरोप करतात. ते आज मंचावर असणार आहेत तर मग धनंजय मुंडे यांच्यावर अन्याय का? महायुतीत 40 टक्के लोकं कलंकित आहेत, हे स्वत: नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. धनंजय मुंडे यांना एक न्याय इतरांना एक न्याय असं का? हा प्रश्न समोर आला आहे.  

वाल्मिक कराडला मकोका लावणं हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. त्याच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरणं हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. पंतप्रधान मुंबईत असताना महाराष्ट्राच्या एका भागात मणिपूर प्रमाणं हिंसाचार होत असेल तर त्याची जबाबदारी गृहमंत्रिपद सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरु होत असताना भाजपचे समर्थक म्हणवून घेणारे लोक रस्त्यावर उतरतात, हिंसाचार करतात, परळी बंद ठेवतात, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतात हा काय प्रकार आहे.  आम्ही आंदोलन केलं तर परवानगी मिळणार नाही, आमच्या लोकांना तुरुंगात टाकतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं. 

लोकांचा आक्षेप आकाच्या आकाला : संजय राऊत

राष्ट्रवादीनं बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली असल्याबाबत विचारलं असता, जोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढत नाही तोपर्यंत या कृतीला काही अर्थ नाही. लोकांचा आक्षेप आकाच्या आकाला आहे. त्याच्यावर कारवाई करायची हिंमत आहे का? तरच संतोष देशमुख यांच्या तपास निष्पक्षपाती होईल. ज्यांच्यावर शिंतोडे उडाले ती व्यक्ती तुमच्या मंत्रिमंडळात आहे, आणि तुम्ही चारित्र्यवान व्यक्तींच्या संदर्भात चर्चा करताय. चारित्र्यवान कुणाला हे आम्हाला वर जाऊन धर्मराजाला विचारावं लागेल चारित्र्याची व्याख्या काय?, आम्हाला परत भगवतगीता शोधावी लागेल, त्यात श्रीकृष्णानं अर्जुनाच्या रथावर स्वार होऊन प्रवचन दिलंय का हा मोठा प्रश्न आहे. चारित्र्यवान कोण याचं उत्तर द्या? असं संजय राऊत म्हणाले?

इतर बातम्या :

Walmik Karad Mcoca: वाल्मिक कराडभोवती तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Vidhan Parishad Election 2026: गिरीश महाजन म्हणाले, नाशिकपाठोपाठ जळगावचा तिढाही सुटला; पण बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
गिरीश महाजन म्हणाले, नाशिकपाठोपाठ जळगावचा तिढाही सुटला; पण बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या 'त्या' कृतीने भुवया उंचावल्या!
NCP Merger into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
Vidhan Parishad Election 2026: 17 पैकी 6 जागांवर बिनविरोध गुलाल, तर 11 ठिकाणी निवडणुकांची रणधुमाळी! नेमकी कशी असते प्रक्रिया, विजयासाठी किती मतांचा लागतो कोटा? वाचा A to Z माहिती
17 पैकी 6 जागांवर बिनविरोध गुलाल, तर 11 ठिकाणी विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी! नेमकी कशी असते मतदानाची प्रक्रिया, विजयासाठी किती मतांचा लागतो कोटा? वाचा A to Z माहिती
NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
रिझर्व बँकेची मोठी कारवाई, उस्मानाबाद जनता बँकेच्या सात संचालकांना पदावरून हटवले, सहकार क्षेत्रात खळबळ
Pune Water Cut : रोज नाही, आता एक दिवसाआड पाणी; पुण्यासाठी महापालिकेचं पाणीपुरवठ्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
रोज नाही, आता एक दिवसाआड पाणी; पुण्यासाठी महापालिकेचं पाणीपुरवठ्यासाठी नवे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या सविस्तर
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
महायुतीचे उमेदवार चार-चारवेळा फोन करतात, वसंत देशमुखांनी एक फोनही केला नाही; जानकरांपाठोपाठ अभिजीत पाटलांचाही विधानपरिषदेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
Sangli Crime: रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
रक्तरंजित राड्याने सांगली हादरली; हमाल नेत्याच्या अवघ्या 13 वर्षीय नातवाला घरात घुसून गोळ्या घालून संपवलं; पाच जणांच्या टोळीचा घरात घुसून गोळीबार
NCP Merger into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा, नाना पटोले दिल्लीला, राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
NCP Merge into Congress: शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या घडामोडींना वेग? नाना पटोलेंना हायकमांडने तातडीने दिल्लीला बोलावलं, एअरपोर्टवर म्हणाले...
Maharashtra Live blog updates: मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
मेट्रोच्या कामादरम्यान लोखंडी पट्टी कोसळून नागरिक जखमी; मिरा-भाईंदर रोडवरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Embed widget