एक्स्प्लोर

Parbhani News : परभणीत रिक्षाचालकांकडून पाच रुपयांची भाडेवाढ, आता प्रति सीट भाडे...

Parbhani News : परभणी शहरातील रिक्षाचालकांनी भाडेवाढ केली आहे. तब्बल पाच रुपये प्रति सीट अशी भाडेवाढ करण्यात आली आहे,

Parbhani News : आधीच इंधन दरवाढीने होरपळलेल्या परभणीकरांना आणखी एक झटका बसला आहे. परभणी (Parbhani) शहरातील रिक्षाचालकांनी भाडेवाढ (Fare Hike) केली आहे. तब्बल पाच रुपये प्रति सीट अशी भाडेवाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे परभणीकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढ (Fuel Rate Hike) आणि शहरातील रस्त्यांची झालेली दूरवस्था (Bad Road Condition) यामुळे रिक्षा चालवणं परवडत नसल्याने भाडेवाढ करण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला आहे.

परभणीकरांना आता 15 रुपयांऐवजी 20 रुपये मोजावे लागणार

नवीन वर्षात परभणी शहरातील रिक्षा संघटनांनी बैठक घेऊन भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला, ज्यात 15 रुपये प्रति सीटऐवजी 5 रुपये वाढवून 20 रुपये प्रति सीट हा नवा दर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात कुठेही जायचे असेल तर 20 रुपये प्रति सीटप्रमाणे आता रिक्षाचालकांना पैसे द्यावे लागणार आहेत. 

इंधन दरवाढ आणि रस्त्याच्या दूरवस्थेमुळे रिक्षाची भाडेवाढ

परभणीत आधीच इंधन सर्वात महाग आहे. तसंच शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच आता रिक्षाचालकांनी केलेली ही भाडेवाढ ही सामान्य परभणीकरांच्या आर्थिक बजेटवर घाला घालणारी आहे. मात्र आम्हाला ही भाडेवाढ करण्या शिवाय पर्याय नसल्याचे रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.

इंधन दरातही परभणीत नंबर 1 

राज्यातील इतर शहरांच्या मानाने परभणी जिल्ह्यामध्ये इंधनाचे दरही सर्वात जास्त आहेत. परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल 108.96 रुपये आणि डिझेल 95.37 रुपये या दराने विक्री केले जात आहे. ज्यामुळे अगोदरच परभणीकरांचे कंबरड मोडलेल असताना आता ऑटो चालकांनीही या इंधन दरवाढ आणि शहरातील असुविधांमुळे चक्क पाच रुपयांची भाडे वाढ केली आहे त्यामुळे हा वेगळा आर्थिक भुर्दंड परभणीकरांना सोसावा लागत आहे.

सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

क्रूड ऑईलच्या दरामधील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. तब्बल सात महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. 22 मे 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा

Solapur : सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
सोलापुरात ‘भोसे पॅटर्न’चा प्रभाव! मोडलिंबमध्येही ग्रामस्थांनी अनाधिकृत पुतळे हटवले
Embed widget