Maratha candidate for Loksabha Election : लोकसभेला मराठा उमेदवार उभं करण्याचं लोण पसरलं, नांदेडपाठोपाठ आता परभणीतून 94 मराठा उमेदवार रिंगणात?
Maratha candidate for Loksabha Election : सगेसोयरेंबाबतची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. नांदेड पाठोपाठ परभणीतूनही मराठा समाजाकडून उमेदवार (Maratha candidate) देण्याची तयारी सुरु झालीये. पुर्णा तालुक्यातील 94 गावं 94 उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत.
Maratha candidate for Loksabha Election : सगेसोयरेंबाबतची मागणी अद्याप पूर्ण झाली नसल्याने मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. नांदेड पाठोपाठ परभणीतूनही मराठा समाजाकडून उमेदवार (Maratha candidate) देण्याची तयारी सुरु झालीये. पुर्णा तालुक्यातील 94 गावं 94 उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर परभणीच्या पूर्णा तालुक्यात सकल मराठा समाजाकडून बैठक घेण्यात आली. बैठकीत लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवण्यासाठी प्रत्येक गावातून एक याप्रमाणे पूर्णा तालुक्यातील 94 गावातून 94 उमेदवार उभे करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत राजकीय पक्षांच्या सर्व कार्यक्रमात वर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाज सरकारला घेरणार
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून बैठका घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक गावातून 2 उमेदवार देण्याची रणनिती आखली जात आहे. शिवाय, फक्त मराठा समाजातीलच नाही तर इतर समाजातील उमेदवारही निवडणुकीत उभे केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महायुती सरकार गंभीर नाही, असे म्हणत बैठकांमध्ये सरकारला घेरण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पार पडल्या बैठका
मराठा आंदोलनाची पुढील दिशा कशी असेल? याबाबत प्रत्येक जिल्ह्यात बैठका पार पडताना दिसत आहेत. बीडमध्ये शनिवारी बैठक पार पडली होती. त्यानंतर अहमदनगर, नांदेड आणि परभणीमध्येही बैठका घेण्यात आल्या आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उमेदवार देण्याचा निर्णय या बैठकांमधून घेण्यात येत आहे. त्यामुळे एका मतदारसंघात किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार, याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर...
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात हजारो मराठा बांधव उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शिवाय, निवडणुकीत मराठा बांधव मराठा आरक्षणाला पाठींबा न देणाऱ्या कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करणार नाहीत. प्रचार सभेत सहभागी होणार नाही, संबंधित उमेदवाराला मतदान करणार नाही, अशी शपथ घेण्यात आलीये.
इतर महत्वाच्या बातम्या