एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Drone Farming : ड्रोनने पिकनिहाय फवारणीची कार्यपद्धत निश्चित; कृषीमंत्र्यांच्या हस्ते मसुद्याचे प्रकाशन

Drone Farming : शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा (Drone) मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. 

Drone Farming : देशभरात ड्रोन द्वारे पीकनिहाय फवारणी करण्याकरता प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. परभणीच्या (Parbhani) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्रमणी आणि समितीने याचा मसुदा तयार केला असून, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या हस्ते या मसुद्याचे प्रकाशन करण्यात आलं आहे. त्यामुळे शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा (Drone) मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. 

केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ इंद्रमणी यांच्या अध्यक्षतेखाली जुलै 2022 मध्ये एक उच्चस्तरीय समिती गठित केली होती. या समितीने सोयाबीन, कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ आदी दहा पिकांकरता ड्रोनने फवारणी करण्याबाबत प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे. याचा मसुदा मंत्रालयाला सादर करण्यात आला होता. तर या मसुद्याचे प्रकाशन दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा, महासंचालक डॉ हिमांशु पाठक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, कृषीतज्ञ, ड्रोन फेडरेशन ऑफ इंडिया, नागरी विमान मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. 

या प्रकाशन कार्यक्रमप्रसंगी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी कीटकनाशकांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. या ड्रोन तंत्रज्ञानाचा लाभ शेतकरी, पदवीधर, लहान शेतकरी आदींसह शेवटच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याकरता शासन प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. 

ड्रोनने फवारणी करण्याबाबत अशी आहे प्रमाणित कार्यपद्धती

या समितीने सोयाबीन, कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई, तीळ आदी दहा पिकांत ड्रोनचा वापराची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली आहे. ड्रोन फवारणी करताना घ्‍यावयाची काळजी याबाबतची मार्गदर्शक तत्‍वे दिली आहेत. कोणकोणती कीटकनाशके, बुरशीनाशके ड्रोन फवारणीस उपयुक्‍त आहेत, त्‍याचे वापरावयाचे प्रमाण, ड्रोन उडण्‍याचा योग्‍य वेग व उंची, पाण्‍याचे प्रमाण, नोझलचा प्रकार, फवारणीकरता योग्‍य हवामानाची स्थिती, पिकांच्‍या कोणत्‍या वाढ अवस्‍थेत ड्रोनचा वापर करावा आदीबाबतचे मार्गदर्शक तत्‍व दिली आहेत. 

अशी काळजी घ्यावी...

ड्रोनने फवारणी करतांना शेतीतील मित्र किडीं आणि पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याबाबत काळजी घ्‍यावी लागणार आहे. सोयाबीनसारख्‍या स्वपरागित पिकांमध्‍ये फुलोऱ्या अवस्‍थेते ड्रोनद्वारे फवारणी टाळण्‍यात यावी अन्‍यथा पिकांचे नुकसान होऊ शकते. पिकांवर कीटकनाशकांची ड्रोनने फवारणी शक्‍यतो सकाळी किंवा सायंकाळी केल्‍यास जास्‍त प्रभावी ठरते. दुपारी किटकांच्‍या अळ्या मातीत लपलेल्‍या असतात. तसेच वाऱ्यांच्या वेग जास्‍त असल्‍यास, उष्‍ण वातावरणात, एक ते दोन दिवसात पावसाची शक्‍यता असताना ड्रोनने फवारणी न करण्‍याची शिफारस करण्‍यात आली आहे. ड्रोनद्वारे फवारणी चुकीच्या पद्धतीने केल्‍यास पर्यावरण दूषित होऊ शकते. यासर्व बाबी ड्रोन चालकांस माहिती असणे आवश्‍यक आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Parbhani : शेतकऱ्यांनी संघर्ष करुन मुजोर विमा कंपनीला नमवलं, सहा वर्षानंतर 42 गावातील 19 हजार शेतकऱ्यांचा लढा यशस्वी 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
Horoscope Today 06 October 2024 : आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज नवरात्रीची चौथी माळ; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget