Palghar : लेकराला वाचवण्यासाठी तिने जीवाचा आकांत केला, पण दुर्देवाने होत्याचं नव्हतं झालं, शिकारीसाठी लावलेला सापळा मायलेकाच्या जीवावर बेतला
Palghar : शिकारीसाठी लावलेला सापळा मायलेकाच्या जीवावर बेतला आहे. ही घटना पालघर मधील बोईसर गावातील आहे.

Palghar : आपलं मूल जेव्हा संकटात असतं तेव्हा कोणतीही आई त्याला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करत नाही. असाच एक प्रकार पालघरमध्ये घडलाय. शिकारीसाठी लावलेला सापळा मायलेकाच्या जीवावर बेतला आहे. जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी लाभलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होउन मायलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे
आई लेकराला वाचवायला गेली, पण...
बोईसर जवळील शिगाव खुताड येथे असलेल्या मिरचीच्या वाडी मध्ये एक परप्रांतीय कुटुंब काम करत होते. त्यांनी शेतीचे रानडुकरांपासून संरक्षण व्हावे यासाठी विजेची तार थेट कुंपणाला लावली होती. शुक्रवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास या विजेच्या तारेला स्पर्श होऊन मुलगा ओम प्रकाश कन्हैया सहानी खाली पडला आणि त्याला वाचवायला गेलेली त्याची आई ललिता देवी कन्हैया सहानी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात बोईसर पोलीस घटनास्थळी पोचले असून याप्रकरणी पंचनामा व अधिक चौकशी सुरू आहे.
रानडुकरांच्या उपद्रवांमुळे बागायती शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान
पालघर जिल्ह्यात बागायती शेतीमध्ये रानडुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होत आहे रानडुकरांच्या उपद्रवांमुळे बागायती शेतीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने पिकांच्या संरक्षणासाठी काही शेतकरी कुंपणाला बेकायदा विद्युत प्रवाह जोडणी लावण्याचे प्रकार करत असतात. पालघर जवळील नंडोरे येथे ऑक्टोबर 2023 मध्ये अशाच एका घटनेत विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दोघा तरुणांचा दुर्दैवी बळी गेला होता
हेही वाचा>>>
Palghar : प्रसुती वॉर्डमध्ये स्लॅपचा भाग कोसळला आणि एकच खळबळ माजली; नुकतीच प्रसुती झालेल्या महिलांमध्ये भीती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
