पाकिस्तानानं ज्या चित्रपटावर घातली होती बंदी तो चित्रपट आता भारतात रिलीज होणार; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस
जॉयलँड (Joyland) हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे. या चित्रपटावर काही महिन्यांपूर्वी पाकिस्ताननं बंदी घातली होती.
Joyland: जॉयलँड (Joyland) हा पाकिस्तानी (Pakistan) चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ऑस्करमधील (Oscar) बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड करण्यात आलं आहे. जॉयलँडचे दिग्दर्शन सॅम सादिक (Saim Sadiq) यांनी केलं आहे. 'जॉयलँड' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या सिनेमावर पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने बंदी घातली. पण नंतर ही बंदी हटवण्यात आली. या चित्रपटाचं अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) देखील कौतुक केलं होतं. आता हा चित्रपट भारताबरोबरच इतर काही देशांमध्ये देखील रिलीज होणार आहे.
जॉयलँड चित्रपटाच्या मेकर्सनं या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा चित्रपट भारतात 10 मार्च रोजी रिलीज होणार आहे, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं. तर हा चित्रपट स्पेनमध्ये 10 फेब्रुवारी रोजी आणि अमेरिकेत 7 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे, असंही या पोस्टरवर लिहिलं आहे. ' जगभरातील प्रेक्षकांसोबत जॉयलँड शेअर करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' असं या पोस्टरला कॅप्शन देण्यात आलं आहे.
जॉयलँडमध्ये 'या' कलाकारांनी साकारली प्रमुख भूमिका
'जॉयलँड' हा चित्रपट पाकिस्तानकडून अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला. हा चित्रपट ऑस्करमधील बेस्ट इंटरनॅशनल फिचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्टेड झाला आहे. सानिया सईद, अली जुनेजो, अलीना खान, सरवत गिलानी, रस्टी फारुक, सलमान पीरजादा आणि सोहेल समीर यांनी जॉयलँड चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
जॉयलँडने कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील Un Certain Regard And Queer Palm या कॅटेगिरीतील ज्युरी पुरस्कार जिंकला होता. कान्स फॅस्टिव्हलमध्ये जॉयलँडचं स्क्रिनिंग झाल्यानंतर या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं होतं. 92 देशांमधील चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म कॅटेगरीसाठी "जॉयलँड" हा चित्रपट एलिजिबल होता.
प्रियांकानं केलं जॉयलँडचं कौतुक
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन जॉयलँड या चित्रपटाचं कौतुक केलं होतं. या पोस्टमध्ये प्रियांकाने लिहिलं होतं, "जॉयलँड इज ट्रूली ए जॉय टू वॉच, ही कथा आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी या चित्रपटाच्या टीमचं कौतुक करते. हा चित्रपट नक्की बघा."
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: