TDM Song : भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम' मधील 'एक फुल' गाणं प्रदर्शित; पृथ्वीराज आणि कालिंदीचा रोमँटिक अंदाज
काही दिवसांपूर्वी 'टीडीएम' (TDM) या चित्रपटामधील 'बकुळा' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
TDM Song Ek Phool: एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' (TDM Marathi Movie) हा चित्रपट रसिकांच्या भेटीस आहेत. भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणी ही या चित्रपटाची खासियत आहे. काही दिवसांपूर्वी 'बकुळा' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. आता या चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं रिलीज झालं असून या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
'व्हॅलेंटाईन्स वीक'चं औचित्य साधत 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं असून या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार (Vinayak Pawar) यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओंकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत. 'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता 'एक फुल' या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर साऱ्यांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे वळल्या आहेत. मात्र त्यासाठी काही क्षणाचा विलंब लागणार आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत, यात शंकाच नाही.
पाहा गाणं:
'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. 28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
काही दिवसांपूर्वी 'टीडीएम' चे पोस्टर रिलीज झाले होते. या चित्रपटाची प्रेक्षक आता उत्सुकतेने वाट बघत आहेत.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: