Nagpur News: नितीन गडकरी यांच्या नागपुरातील ड्रीम प्रोजेक्टला जबर धक्का; अज्ञात व्यक्तीकडून शेकडो झाडांची कत्तल, गुन्हा दाखल
Nagpur News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ड्रीम प्रोजेक्टला काही अज्ञात व्यक्तीने जबर धक्का दिल्याचे समोर आले आहे. यात नागपूर शहरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केल्याचे समोर आले आहे.

Nagpur News: नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या ड्रीम प्रोजेक्टला काही अज्ञात व्यक्तीने जबर धक्का पोहचवल्याचे समोर आले आहे. नागपूर शहरातील (Nagpur News) रिंग रोड परिसरातील शेकडो झाडांची अक्षरशः कत्तल केली आजे. दरम्यान कुठलीही परवानगी नसताना ही कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी आता पोलिसात तक्रार करण्यात आली असून अज्ञाता विरोधात वृक्षतोडीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे कृत्य करणाऱ्याचा ही शोध घेतला जातोय.
अज्ञाता विरोधात वृक्षतोडीचा गुन्हा दाखल
नागपूरचा रिंग रोड हा हिंगणा टी-पॉइंटपासून कळमनापर्यंत अनेक किलोमीटर लांबीपर्यंत पसरला आहे. मात्र, या रिंग रोडवर त्रिमूर्तीनगर ते छत्रपती चौक दरम्यान सुमारे चार किलोमीटरच्या अंतरात दुभाजकावर लावण्यात आलेल्या शेकडो झाडांना अत्यंत क्रूर पद्धतीने कापण्यात आले आहे. कोणाच्याही परवानगीशिवाय करण्यात आलेल्या या वृक्षतोडीमुळे अगदी 20-20 फुटांचे अशोकाचे शेकडो झाड आता फक्त तीन ते चार फुटांचे शिल्लक राहिले आहे. तर अनेक शोभिवंत पामच्या झाडांची पण अशाच पद्धतीने कत्तल करण्यात आली आहे.
अशोकाचे 410 तर पामचे 152 झाडांची कत्तल
या संदर्भात आता पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासानुसार अशोकाचे 410 तर पामचे 152 झाड तोडण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मात्र सिमेंटचा रिंग रोड बांधून झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षात वाढलेल्या शेकडो झाडांची अशा पद्धतीने कत्तल फक्त नागपूरच्या हिरवळीचे मोठे नुकसान नाही आहे. तर महापालिकेचे लक्ष कुठे आहे? असा प्रश्न निर्माण करणाराही आहे. दुसरीकडे या कृत्याने वनप्रेमी, वृक्षप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींणी संताप व्यक्त केला आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या रिंग रोडवर सुमारे 600 झाडांच्या अवैध पद्धतीने केलेल्या कापणी बद्दल पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी झाड कापणाऱ्या मजुरांची ओळख पटवली असून त्यांना बोलावून त्यांची चौकशी ही केली आहे. त्यांनी झाड कापण्याचे निर्देश देणाऱ्या कंत्राटदाराची माहिती पोलिसांना दिली असून त्या कंत्राटदाराचा शोध सध्या सुरू आहे. झाडांची अवैध पद्धतीने कापणी केल्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर पोलिसांनीअज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
