Naxalism: नक्षल्यांची पत्राद्वारे सरकारकडे गयावया; म्हणाले की, आम्हाला शांततेच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा करायचीय; एक महिना नक्षलविरोधी ऑपरेशन्स थांबवा
Chhattisgarh Naxal: पुढील एक महिना सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन्स थांबवा, अशा आशयाचे पत्र पाठवून नक्षलवाद्यांनी सरकारला उद्देशून नवीन पत्र पाठवत आपली भूमिका मांडली आहे.

New Naxal Letter To Goverment : पुढील एक महिना सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन्स थांबवावे, सरकारसोबत शांततेच्या आमच्या प्रस्तावा संदर्भात आम्हाला आमच्या केंद्रीय समिती तसेच स्पेशल जोनल कमिटीच्या कॉम्रेडस सोबत चर्चा करायची आहे. आम्हीही आमच्या कॉम्रेडसला सुरक्षा दलांवर गोळी न चालवण्याच्या सूचना दिल्या असल्याची गयावया नक्षल्यांनी सरकारकडे केली आहे. नक्षलवाद्यांनी सरकारला उद्देशून नवीन पत्र पाठवत आपली भूमिका मांडली असून हे पत्र आता समोर आले आहे.
सरकारने सुरक्षेची गॅरंटी द्यावी आणि एक महिना सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स थांबवावे
नक्षलवाद्यांकडून सरकारला उद्देशून आणखी एक पत्रक काढण्यात आला आहे. नक्षलवाद्यांचे उत्तर पश्चिम सबजोनल कमिटीचा प्रभारी रुपेश ने हे पत्रक काढले असल्याची माहिती पुढे आलीय. त्यामध्ये सरकारने खास करून छत्तीसगड सरकारने एक महिना सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स थांबवावे, अशी मागणी केली आहे. सरकार समोर आम्ही ठेवलेल्या आमच्या शांतता प्रस्ताव मागे कुठलीही रणनीती नाही. मात्र शांततावार्तेत सहभागी होण्यासाठी काही नावं निश्चित करायची आहे, आणि त्यासाठी आमची केंद्रीय कमिटी तसेच स्पेशल जोनल कमिटीचे कॉम्रेड्स यांची आपापसात भेट होणे गरजेचे आहे. त्यासाठी छत्तीसगडमध्ये सरकारने सुरक्षेची गॅरंटी द्यावी आणि एक महिना सुरक्षा दलांचे ऑपरेशन्स थांबवावे, अशी मागणी या पत्रकाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आम्ही आधीच आमच्या कॉम्रेडला आणि दलमला सुरक्षा दलांवर गोळी न चालवण्याचे सूचना दिल्या आहे. हेही या पत्रकाच्या माध्यमातून नक्षलवाद्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान नक्षलवाद्यांच्या सरकार समोरील शांतता प्रस्तावावर भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षांनी पण प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र सध्या तरी आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. सध्या आम्ही फक्त सरकारसोबत शांततावार्तेवर लक्ष केंद्रित करत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
वर्षभरात आतापर्यंत एकट्या छत्तीसगडमध्ये 71हून अधिक नक्षलवादी ठार
दरम्यान, पोलिसांनी नक्षल विरोधी मोहीम अधिक तीव्र केली असताना स्थानिक नागरिकांनीही या नक्षलवाद्यांच्या कारवाईविरोधात बंड पुकारले आहे. त्यामुळे गडचिरोली आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित भागात नक्षल मोहीम खिळखिळी झाली आहे. अशातच, यावर्षी छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. आतापर्यंत एकट्या छत्तीसगडमध्ये 71हून अधिक नक्षलवादी ठार झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, 2024 मध्ये जवानांनी वेगवेगळ्या चकमकीत सुमारे 300 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. सोबतच 290 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
हे ही वाचा
























