एक्स्प्लोर

हार्दिक पांड्या अन् जास्मिन वालियाच्या डेटची चर्चा; नताशा स्टॅनकोविकची पोस्ट, म्हणाली, सर्व काही...

Hardik Pandya Jasmin Walia: हार्दिक पांड्या आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Hardik Pandya Jasmin Walia: टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै रोजी सोशल मीडियावर पोस्ट करत हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकने घटस्फोट घेत असल्याची माहिती दिली.मात्र दोघांनी अचानक विभक्त होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत अधिकृत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. मात्र याचदरम्यान हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि ब्रिटीश गायिका जास्मिन वालिया (Jasmin Walia) एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. हार्दिक आणि जास्मिन दोघेही ग्रीसमध्ये एकत्र सुट्टी घालवल्याची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्या समोर आलेल्या फोटोनंतर नताशा स्टॅनकोविकची (Natasha Stankovic) पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

नताशा पोस्टद्वारे काय म्हणाली?

नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये देवावर विश्वास व्यक्त करत सर्व काही ठीक होईल, असं नताशाने म्हटलं आहे. योग्य वेळ आल्यावर देव सर्व काही ठीक करेल...जर आपण असे केले तर देवाला सर्वकाही सुरळीत करण्याची संधी मिळेल आणि यानंतर आपण वेगाने पुढे जाऊ, असं नताश पोस्टद्वारे म्हणाली. 

दोघांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण-

हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया एकाच ठिकाणी आणि एकाच पूलमध्ये असल्याचं दिसतंय. हार्दिक पांड्याने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये आजूबाजूचे दृश्य आणि जास्मिनने पोस्ट केलेल्या फोटोतील दृश्य एकच असल्याचं दिसून येत आहे. जस्मिनच्या या बिकिनी पोस्टवर हार्दिकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तरी, हार्दिकने जास्मिनचे अलीकडील सर्व फोटो लाईक केले आहेत. विशेष म्हणजे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात, यामुळे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jasmin Walia (@jasminwalia)

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते. लंडनमधील एसेक्समध्ये जन्मलेल्या जास्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. 'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जास्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. जास्मिननने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि 2018 मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. जास्मिन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे 6.4 लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जास्मिनला 5.7 लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. 

संबंधित बातमी:

बॉलिवूडमधील गाण्याचा रिमेक, टीव्ही मालिकेत काम; आता हार्दिक पांड्याला करतेय डेट?, कोण आहे जास्मिन वालिया?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
CJP : कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?  सौरव दास, आशुतोष रांका यांच्यावर कोणती जबाबदारी?
कॉकरोच जनता पार्टीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, अभिजीत दिपके यांच्या टीममध्ये कोणाला संधी?
PM Modi Instagram Reel :'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ
'साथियो...' म्हणत नरेंद्र मोदींकडून रात्री पुन्हा व्हिडीओ शेअर, हातात शॉल घेऊन दिला 1905 चा संदर्भ

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget