(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Advay Hiray : अद्वय हिरे यांचा मुक्काम कोठडीतच, न्यायालयाचा दिलासा नाहीच, जामीन फेटाळला
Nashik News : मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाच्या अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला. रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणात अद्वय हिरे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नाशिक: रेणुका सूत गिरणी कर्ज फसवणूक प्रकरणी मालेगाव न्यायालयाने शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे (Advay Hire) यांचा जामीन अर्ज फेटाळला. अद्वय हिरे यांनी यांच्यावरील गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर आहे, त्यामुळे हिरे यांना आता जामीन दिल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात असा युक्तिवाद नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी न्यायालयासमोर मांडला होता. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला.
नाशिक जिल्हा बँकेच्या वकिलांनी युक्तिवात करताना सांगितलं की, अद्वय हिरे यांनी घेतलेले 7 कोटी 40 लाख रुपयांचे कर्ज आज 32 कोटीपर्यंत पोहोचले आहे. यातील एकही हप्ता हिरे यांनी भरलेला नाही.तसेच ते पैसे ज्या सूत गिरणीसाठी घेतलेले होते पण तिथे न वापरता इतरत्र वापरले. म्हणून त्यांच्यावर एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
अद्वय हिरे यांना जामीन नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा चांगलाच हिरमोड झाला. तसेच त्यांचा जामीन नाकारल्याने ठाकरे गटाचा मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जातंय.
नेमकं प्रकरण काय?
मालेगावच्या रेणुका सुत गिरणीसाठी जिल्हा बँकेकडून साडेसात कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याने अद्वय हिरे यांच्या विरोधात रमजानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्यांना भोपाळवरून अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यांना न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी सुमारे दीड तास चाललेल्या दोन्ही युक्तीवादानंतर बँकेला सुट्टी असल्याने कर्ज प्रकरणात बँकेचे इतिवृत्त तपासणे बाकी आहे , कर्ज प्रकरणी अजूनही काही लोकांचे जबाब नोंदवणे बाकी असल्याचे कारण सांगून पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पुन्हा त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आठ वर्ष जुनी केस
दरम्यान, बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. सुरुवातीपासूनच आम्ही न्यायालयीन लढाई लढत असून न्यायव्यवस्थेचा पूर्ण विश्वास असल्याचे डॉ.अपूर्व प्रशांत हिरे यांनी यापूर्वी सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मविआच्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे, असा आरोप यापूर्वी अपूर्व हिरे यांनी केला होता.
ही बातमी वाचा: