Nashik News : नाशिक जिल्ह्यात रामदास कदमांनी येऊन दाखवावं, शिवसेना आक्रमक; पुतळ्याचे दहन
Nashik News : नाशिक जिल्ह्यात (Nashik) रामदास कदम यांनी येऊन दाखवावं असा इशारा शिवसेनेचे (Shivsena) जिल्हाप्रमुख करंजकर (Vijay Karanjkar) यांनी दिला.
नाशिक : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंविषयी (Uddhav Thackeray) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. नाशिक येथेही पडसाद उमटत असून नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले.
नाशिक (Nashik) शिवसेना (Shivsena) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. नाशिक शहरातील शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाजवळ झालेल्या आंदोलनात रामदास कदम यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा नाशिक शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान रामदास कदम यांच्या टिकेवरून शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून नाशिक शिवसेनेने रामदास कदम यांच्या पुतळ्याचे दहन केले. यानंतर तीव्र आंदोलन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले की, रामदास कदम यांना बाहेरच झालं आहे, शिवसेनेने त्यांना शिवेसेनेचे नेतेपद बहाल केले, मागच्या दाराने आमदार दिले. नारायण राणे हे बाहेर पडले , तेव्हा याना शिवसेनेचे मंत्रिपद दिले. शिवसेनेने काही कमी केले नाही, अनेकजण इतरांना शिवसेनेबद्दल चुकीचं सांगून फितूर व्हायला सांगत आहेत. रामदास कदम यांना शिवसेनेने भरभरून दिल, मात्र त्यांचं समाधान झालं नाही, यापुढे काळजी घेऊ, मात्र रामदास कदम यांनी नाशिक जिल्ह्यात येऊन दाखवावं असा इशारा करंजकर यांनी दिला.
रामदास कदम काय म्हणाले होते...
शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली. यावरून मुंबईसह कोकणातील शिवसेना नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत… अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.