एक्स्प्लोर
Advertisement
भिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलचं निलंबन
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड रेल्वे स्थानकात भिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी रेल्वे पोलिस कॉन्स्टेबल जयकुमार तायडेंना निलंबित करण्यात आलंय. मागच्याच आठवड्यात मनमाड रेल्वे स्टेशनवर एका भिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये झोपलेल्या भिकाऱ्याला तिथे झोपल्याच्या कारणावरुन मारहाण करण्यात आली होती. तसंच त्याला वाईट शिव्याही घालण्यात आल्या होत्या. रेल्वे पोलीस जयकुमार तायडेंनी ही मारहाण केली होती.
मनमाड रेल्वे स्टेशनमध्ये हा भिकारी झोपला होता. रात्री उशिरा त्याठिकाणी दाखल झालेल्या पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी हातातील रॉडनं भिकाऱ्याला बेदम मारलं. हा सर्व प्रकार घडत असताना तिथे बघ्यांची गर्दीही जमली. मात्र पोलिसांना थांबवण्याची तसदी कुणीही घेतली नाही. मात्र या सर्व मारहाणीचं मोबाईलमध्ये शुटिंग करण्यात आलं होतं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
मनमाडमध्ये मारहाण झालेला भिकारी हा अपंग होता. त्यामुळे अपंग भिकाऱ्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत होतं. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागपूर रेल्वेचे एसपी दत्ताराम राठोड यांनी पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार तायडेंना निलंबित केलं आहे.
संबंधित बातम्या :
मनमाड रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या भिकाऱ्याला पोलिसांची बेदम मारहाण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement