एक्स्प्लोर
नाशकात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : नाशिकमध्ये देवळाली परिसरात शाळेच्या संपकरी कर्मचाऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. झाडाला गळफास घेऊन कर्मचाऱ्याने जीव दिला. चिन्नप्पा मन्द्री असं आत्महत्या केलेल्या 45 वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. पगारवाढीच्या नैराश्यातूनच चिन्नप्पा यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे गेल्या 8 महिन्यांपासून पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. यामध्ये 94 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. चिन्नप्पाच्या आत्महत्येनंतर संतप्त कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली आहे.
आणखी वाचा






















