एक्स्प्लोर
नाशकात लक्झरी-दुचाकी अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू
नाशिक : नाशकात लक्झरी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. नाशिकमधल्या पिंपळगाव बसवंतमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला.
पहाटे सहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सचिन वसंत मुंजे, दत्ता अशोक सूर्यवंशी, योगेश मंगळू पवार अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावं आहेत. कंपनीत कामावर जात असतानाच या तिघांना लक्झरीनं उडवलं.
तिघेही जण निफाड तालुक्यातील कसबे सुकेणा गावचे रहिवाशी आहेत. तिघांच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
सटाण्यात ट्रक-ट्रेलर अपघातात दोघांचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातल्याच सटाणा-ताऱ्हाबाद रोडवर ट्रक आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ट्रक आणि ट्रेलरचा चालक असे दोघेही ठार झाले. सकाळी साडे सात वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement