एक्स्प्लोर
नाशकात नववीतील विद्यार्थ्याकडून वर्गमित्राची मैदानावर हत्या
नाशिक : नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझरमधल्या एका सुप्रसिद्ध शाळेत हा प्रकार घडल्याची माहिती आहे. अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने छातीत चाकू भोसकून वर्गमित्राची हत्या केली. मयत विद्यार्थी सतत टपल्या मारत असल्याचा राग आरोपी विद्यार्थ्याच्या मनात खदखदत होता. त्यामुळे आरोपीने दप्तरातून चाकू शाळेत आणला होता.
मंगळवारी पीटीचा तास सुरु असताना पुन्हा आरोपीला संबंधित विद्यार्थ्याने टपली मारली. त्याच रागातून आरोपीने चाकू बाहेर काढला आणि शाळेतच मित्राच्या छातीत सुरा खुपसून त्याची हत्या केली. संध्याकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मैदानावर ही घटना घडली.
जखमी विद्यार्थ्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. आरोपी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement