एक्स्प्लोर

8 घरांच्या इमारतीला 24 लाखांची घरपट्टी, नाशिककर हैराण

मनपा प्रशासनाच्या चुकीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने, घरपट्टी भरणं तर दूरच परंतु प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा इरादा स्थानिकांनी केला आहे.

नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लादलेल्या करवाढीचा बोजा नाशिककरांना आता जाणवू लागला आहे. आठ सदनिकांच्या एका इमारतीला तब्बल 24 लाखांहून अधिक रुपयांची घरपट्टी बजावल्याने रहिवाशांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी स्थानिकांनी सुरु केली आहे. नाशिकच्या गंगापूररोड परिसरात लिबर्टी लोटस नावाची आठ सदनिकांची इमारत आहे. 2012 मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आणि आठ कुटुंब इथे राहण्यासाठी आले. तेव्हापासून घरपट्टी लागू करावी अशी त्यांची मागणी आहे. गेल्या पाच वर्षात अनेकवेळा महापालिका कार्यालायचे उंबरे झिजवले, विनंती अर्ज केले, मात्र ठिम्म प्रशासन जागं झालं नाही. विशेष म्हणजे पाणीपट्टी पहिल्या वर्षापासून लागू आहे. पण घरपट्टी घेतलीच जात नाही. तुकाराम मुंढेंसारखे कार्यक्षम अधिकारी आल्याने दफ्तर दिरंगाई दूर होईल, अशी अपेक्षा रहिवाशांना होती. त्यामुळे त्यांनी मुंढे यांच्याकडेही अर्ज सादर केला. पण आठ दिवसातच आपल्या प्रामाणिकपणाची दंडात्मक पावतीच नागरिकांना मिळाली. लिबर्टी लोटस इमारतीतील रहिवाशांच्या नावाने महापालिकेन मागील थकबाकी, तीनपट दंडासहित प्रत्येकी अडीच ते तीन लाख रुपयांची अशी एकूण 24 लाखांहून अधिक रुपयांची घरपट्टी बजावली आहे. आता एवढा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. वारंवार मागणी करुनही घरपट्टी लागू केली नाही. आता घरपट्टी बजावली ती 24 लांखाची. मनपा प्रशासनाच्या चुकीमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने, घरपट्टी भरणं तर दूरच परंतु प्रशासनाविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा इरादा स्थानिकांनी केला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी करवाढ लागू केली आहे. 3 पैसे चौरस फुटांवरुन थेट 40 पैसे चौरस फुटांवर घरपट्टी वाढवण्यात आली. ज्या सदनिकांना वर्षाकाठी दीड ते दोन हजार घरपट्टी येत होती, त्याऐवजी नवीन बांधकामांना 24 ते 25 हजार घरपट्टी लागू होणार आहे. ज्या घरात भाडेकरु असतील त्याच्या घरपट्टीत दुपटीने वाढ होणार आहे. त्यामुळे करवाढ चुकीची असल्याची ओरड होत आहे. हाच धागा पकडून राजकीय पक्ष आणि काही संघटनानी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाची झळ नागरिकांना बसू लागली आहे. घरपट्टी पाणीपट्टी नागरिकांना घरापर्यंत पोहचू लागल्याने आयुक्तांविषयी पर्यायाने सत्तधारी भाजपाविषयी रोष वाढू लागला आहे. एकीकडे मुख्यमंत्री दखल घेत नाही, दुसरीकडे मुंढे कवडीचीही किंमत देत नाही आणि तिसरीकडे नागरिकांची नाराजी वाढत असल्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 वा हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Embed widget