एक्स्प्लोर
नाशिकपाठोपाठ पुणे, पिंपरीतही स्वाभिमानीचा भाजपला दे धक्का

नाशिक : नाशिकपाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपला दणका दिला आहे. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज संध्याकाळी होणाऱ्या सभेत याबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे. जिल्हा परिषद तसंच महापालिका निवडणुकीत जागावाटपात भाजपने विश्वासात घेतलं नाही, साधी चर्चाही केली आहे. उलट युती नसताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा फोटो, प्रचारात वापरत असल्याचा आरोप नाशिकचे युवा स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला. ग्रामीण भागात नोटाबंदी, शेतीमालाचे भाव तसंच कांद्याचे आंदोलनांबाबत भाजपविषयी नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत भाजपला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























