एक्स्प्लोर
नाशकातील गोदाकाठ पाण्याखाली; केशार्पण, पिंडदान रस्त्यावर
आज सर्वपित्री आमावस्या आहे. पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असल्याने देशभरातून हजारो भाविक गोदाकाठी आले आहेत. परंतु पावसामुळे धार्मिक विधींसाठी भाविकांची धावपळ सुरु आहे.
नाशिक : नाशिकमधील मुसळधार पाऊस आणि धरणांमधून केलेल्या पाण्याचा विसर्गाचा फटका, देशभरातून पिंडदानासाठी आलेल्या भाविकांना बसला आहे. संपूर्ण गोदाकाठ पाण्याखाली गेल्याने लोकांना रस्त्यावरच धार्मिक विधी करण्याची वेळ आली आहे.
आज सर्वपित्री आमावस्या आहे. पितृ पंधरवड्याचा शेवटचा दिवस असल्याने देशभरातून हजारो भाविक गोदाकाठी आले आहेत. परंतु पावसामुळे धार्मिक विधींसाठी भाविकांची धावपळ सुरु आहे.
रामकुंड परिसरातील रस्त्यावरच केशार्पण, पिंडदान रस्त्यावर सुरु झाल्याने इथली वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर नो एन्ट्री करण्यासह विविध उपाययोजना करत पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement