एक्स्प्लोर
नग्नावस्थेत नागरिकांना लुटणाऱ्या 'गोल्डन बाबा'ची टोळी गजाआड
एका निवृत्त पोलिस उपनिरीक्षकासह चौघा जणांची 'गोल्डन बाबा'ने अशाप्रकारे नाशकात लूट केली होती.
नाशिक : 'गोल्डन बाबा' असल्याचं सांगत नग्नावस्थेत नागरिकांना लुटणाऱ्या टोळीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नाशिकच्या गुन्हे शाखेने भामट्या गोल्डन बाबासह चौघांना गुजरातमधून अटक केली.
गेल्या आठवड्यात नाशिकच्या म्हसरुळ परिसरात एक निवृत्त पोलिस उपनिरीक्षक इव्हिनिंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका वॅगन आर कारमधून तिघे जण खाली उतरले. त्यांच्या पाठोपाठ एक माणूस नग्नावस्थेत कार मधून खाली आला.
'मी गोल्डन बाबा आहे. परदेशातून भक्त माझ्या दर्शनाला येतात. आज तुझं नशीब आहे की मी तुला प्रकट झालो. ये माझा आशीर्वाद घेऊन मला दक्षिणा दे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील' असं म्हणत त्याने पोलिसाला जवळ बोलावलं. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन घेऊन ते पसार झाले. ते जाताच आपली लूट झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी म्हसरुळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी सुरेशनाथ सुरमनाथ मदारी, राजूनाथ जोरानाथ मदारी, राजूनाथ अर्जुननाथ मदारी आणि श्रावण कमलनाथ मदारी यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता नाशिकमध्येच चार जणांची अशाप्रकारे लूट केल्याची कबुली त्यांनी दिली.
एक वॅगन आर कार आणि दागिन्यांसह एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे चारही जण पूर्वी नाग आणि माकडाचे खेळ करुन पोट भरायचे, मात्र सरकारने यावर बंदी घातल्यामुळे ते बेरोजगार झाले. शेवटी त्यांनी हा मार्ग निवडल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
नाशिक
क्राईम
Advertisement