एक्स्प्लोर
नाशकात कारमध्येच गर्भलिंग निदान चाचणी केंद्र!
त्याआधारावर महापालिकेच्या पथकाने इनोव्हा कारची तपासणी केली असता गर्भलिंग निदान चाचणीचं साहित्य आढळलं.
नाशिक : नाशिकच्या सातपूरमध्ये एका कारमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केंद्र चालवलं जात असल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने डॉ. तुषार पाटील यांचं शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटर सील केलं आहे.
महापालिकेला ‘आमची मुलगी’ या वेबसाईटवर सातपूर इथल्या शाकुंतल डायग्नोस्टिक सेंटरचे डॉ. तुषार पाटील यांच्या इनोव्हा कारबाबत तक्रार प्राप्त आली होती. त्याआधारावर महापालिकेच्या पथकाने इनोव्हा कारची तपासणी केली असता गर्भलिंग निदान चाचणीचं साहित्य आढळलं.
दरम्यान, या प्रकरणी पीसीपीएनडीटी अॅक्ट 1994नुसार कारवाई करण्यात आली असून गर्भलिंग निदान चाचणीचं साहित्य जप्त केलं आहे. मात्र कारमध्ये गर्भलिंग चाचणीचं केंद्र चालवत जात असल्याचं समोर आल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement