एक्स्प्लोर
नाशिकमध्ये दुहेरी खून प्रकरणात नगरसेवकाच्या मुलाला अटक
नाशिक: नाशिकमधील रिपाइं जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक प्रकाश लोंढेंच्या मुलाला दुहेरी खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून फरार असलेल्या भूषण लोंढेला पुण्यातून अटक करण्यात आली. तसंच इतरही दोघांना अटक करण्यात आली आहे.
31 डिसेंबर रोजी झालेल्या दुहेरी हत्यांकांडात भूषण लोंढे मुख्य संशयित आहे. मधल्या काळात उच्च न्यायालयातून 2 दिवसांचा अंतरिम जामीन मिळवून भूषणचा विवाह सोहळाही संपन्न झाला होता. ज्याला सध्याचे केंद्रीयमंत्री रांमदास आठवलेही हजर होते.
पण, यानंतर पोलिसांच्या स्वाधीन होण्याऐवजी भूषण फरार झाला होता. लोंढे कुटुंबीयांवर अनेक प्रकरणात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं आता भूषणवर मोक्का लावण्याची चाचपणी नाशिक पोलीस करत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement