शेतमजुरांच्या मजुरीचे दर ठरवणारी देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायत!
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायतीने शेतकरी आणि मजूर यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारी दहिवड ही ग्रामपंचायत ही कदाचित पहिलीच असावी.
नाशिक : जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायतीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. शेतकरी जगला तरच मजूर जगेल, असे धोरण आखत गावातील शेतमजूरांना मजूरीचे दर ठरवण्याचा निर्णय दहिवाड ग्रामपंचायतीने घेतला. असा निर्णय घेणारी दहिवड ग्रामपंचायत जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मालाला फारसा भाव मिळाला नाही. तर कधी शेतमाल फेकून देण्याची वेळ आली. खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांना मजूरांची गरज भासत असताना बाहेरगावाहून मजूर आणावे लागत असत. त्यामुळे गावात कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका होता. सोबतचं मजूर सुध्दा लवकर उपलब्ध होत नसल्याने दहिवाडच्या शेतकऱ्यांनी ही समस्या ग्रामपंचायतीसमोर मांडली. त्यावर गावातील पारावरच्या मंदिरात एकत्रित येत शेतकऱ्यांना पिकाचा दाम मिळावा आणि मजूरांना त्यांची योग्य मजूरी मिळावी, असा निर्णय ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ सूर्यंवंशी यांच्या समोर ठेवला आणि सरपंच सूर्यवंशी यांनाही त्यास होकार दिला.
शेतीकामांची मजुरी फिक्स कोणत्या कामाला किती मजुरी द्यावी याचा सर्वानुमते निर्णय घेत कांदा लागवड, खुरपणी यासाठी प्रती व्यक्ती 200 रुपये, बाजरी खुडणे यासाठी 250 रुपये आणि कापणीसाठी 300 रुपये, असा दर निर्श्चित केला आहे. तशी सुचना गावच्या वेशीवरील बोर्डवर लिहिण्यात आली आहे. विशेष म्हणजे कामाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 6 म्हणजेच आठ तास केला आहे. सर्वानुमते घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार यापुढे मजूरीचे कोणीही वाढीव दर देऊ नये, अशा सुचना देण्यात आल्याचं सरपंचानी स्पष्ट केलंय.
'राज्यात रोज सरासरी सहा शेतकरी आत्महत्या, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं', भाजपचा आरोप
ग्रामपंचायतीचा निर्णय शेतकरी आणि मजूर दोघांनाही फायदेशीर लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळेलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नासल्याने शेतकरी कोलमडला आहे. मजुरीचे दर वाढत असल्याने शेतकरी हतबल झाला असल्याचं शेतकरी सांगतात. बाहेरगावहून मजूर बोलवताना त्यांना ने-आण करावी लागते, यात शेतकऱ्यांचा अधिक पैसा आणि वेळ जातो, त्यामुळे गावातील मजुरांनाच मजूरी द्यावी गावातील मजूर बाहेर जाणे योग्य नसल्याने गावातील मजूरांनाच मजूरी दिली तर त्यांचा उदरनिर्वाह योग्य होईल, अस मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय.
एकुणच कोरोनामुळे बाहेरचे मजूर गावात नको आणि स्थानिक मजूर बाहेर मजूरीसाठी गेले तर कोरोनाची भिती. त्यामुळे दहिवडच्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतलेला हा निर्णय योग्यच असल्याच मत अनेकांनी व्यक्त केलंय.
Rural News | नाशिक जिल्ह्यातील माणिकपूंज धरण ओव्हरफ्लो | माझं गाव माझा जिल्हा