एक्स्प्लोर

'राज्यात रोज सरासरी सहा शेतकरी आत्महत्या, सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं', भाजपचा आरोप

राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे.

नागपूर : राज्यात जानेवारी ते जून या सहा महिन्यात तब्बल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. रोज सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचा पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. रोज कोरोनाचं वाढतं संकट, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या याचीच चर्चा होत असताना राज्यात गेल्या सहा महिन्यात तब्ब्ल 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 1 जानेवारी ते 30 जून या सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यात एक हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून राज्य सरकार गप्प असल्याचा आरोप ही बावनकुळे यांनी केला.  50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा शेतकऱ्यांच्या अवस्थेकडे गेले सहा महिने राज्य सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले आहे. त्यातच कोरोनाचा संकट आल्याने सर्वच बाजारपेठा संकटात आल्या. कोरोना संकटाच्या काळात जसं इतर बाजारपेठांवर संकट कोसळलं. तसंच शेतमाल आणि भाजीपाल्याच्या बाजारपेठांवर ही संकट कोसळलंय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना गेले अनेक महिने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे नैराश्यात असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे जीवन संपवल्याचे बावनकुळे म्हणाले. राज्य सरकारने त्वरित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 50 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी ही बावनकुळे यांनी केली आहे. रोज सरासरी सहा शेतकऱ्यांची आत्महत्या  गेल्या सहा महिन्यात राज्यात 1 हजार 74 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून सरासरीने रोज सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं यामुळे उघड झालं आहे. मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा सर्वाधिक फटका राज्यातील शेतमालाच्या बाजारपेठेला परिणामी शेतकऱ्यांना बसला आहे. खासकरून फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अजून ही फळे आणि भाजीपाला शहरातील बाजारापर्यंत पोहोचू शकत नाही आहे. परिणामी मालाची नासाडी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचे पॅकेज आणावे अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑगस्ट 2026 | सोमवार
Sanjay Raut on Girish Mahajan: गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
गिरीश महाजनांना नाशिकचं पालकमंत्रिपद मिळताच भाजपचा जल्लोष, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, ‘निर्लज्ज लोक, अकलेचा दुष्काळ’
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Girish Mahajan: पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, नाशिककरांना दिला मोठा शब्द!
पांडुरंग पावला! दर्शन घेताना बायकोने कानात बातमी सांगितली, आता नाशिकचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल; नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget