एक्स्प्लोर

नाशकातही रेल्वेमार्गावर 5 फुटी दगड, दोन एक्स्प्रेसचा अपघात टळला

नाशिक : राज्यात रेल्वेमार्गांवर घातपात घडवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचं चित्र आहे. नवी मुंबई, अकोल्यापाठोपाठ नाशिकमध्ये रेल्वे रुळांवर पाच फूट उंच दगड आढळला आहे. मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे दोन एक्स्प्रेस ट्रेनचे अपघात टळले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता खेरवाडी ओढा दरम्यान ही घटना उघडकीस आली आहे. क्रॉसिंगच्या वेळी अपघात घडवण्याचा डाव असल्याचा संशय आहे. मोटरमनच्या प्रसंगावधनामुळे शालिमार एक्स्प्रेस आणि दादर-अमृतसर एक्स्प्रेस यांचा अपघात टळला. रेल्वे रुळांवर संशयास्पद वस्तू आढळण्याची गेल्या आठवड्यातली ही राज्यातील पाचवी, तर महिन्याभरातली सहावी घटना आहे. रेल्वे रुळावर आढळलेला पाच फुट उंच दगड हा फॉलोविंग मार्क सांगणारा दगड असल्याची माहिती आहे, मात्र तो ट्रॅकवर कसा आला किंवा कोणी ठेवला याबाबत मात्र माहिती उपलब्ध झालेली नाही. रेल्वे पोलिस सकाळपासून घटनास्थळी तपास करत आहेत.

नवी मुंबईत रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या

नवी मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या होत्या. तळोजा ते नावडे रोड स्टेशनदरम्यान रेल्वे रुळात जिलेटिनच्या चार कांड्या आढळल्या. तळोजा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईत रेल्वे रुळांवर विजेचा खांब, घातपाताचा संशय

नवी मुंबईत गव्हाणफाटा जवळ रेल्वे ट्रॅकजवळ विजेचा खांब ठेवला होता. पनवेलपासून जवळ असलेल्या गव्हाणफाटा येथे रेल्वे ट्रॅकवर विजेचा खांब ठेवण्यात आला. हा रेल्वेमार्ग जेएनपीटीकडे जाणारा आहे. जेएनपीटी बंदरात येणारा माल हा मालगाड्यांच्या माध्यमातून आणला जातो. त्यासाठी या रेल्वेमार्गाचा वापर होतो.

अकोल्यात रेल्वे ट्रॅकवर दगड ठेऊन घातपाताचा प्रयत्न

अकोल्यात रेल्वे मार्गावर मोठा दगड ठेवल्याचं आढळलं होतं. 7 फेब्रुवारीला संध्याकाळी 7.30 वाजता ही घटना उघडकीस आली. अकोला-सिकंदराबाद रेल्वे मार्गावर ही घटना घडली. बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड-अमानवाडी गावादरम्यान 25 ते 30 किलो वजनाचा मोठा दगड रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला होता. या मार्गावरुन इंटरसिटी एक्स्प्रेस धावणार होती. सुदैवाने मोठा अपघात टळला.

दिवा-पनवेल मार्गावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला!

दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर मोटारमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेसला होणारा भीषण अपघात टळला आणि एक्सप्रेसमधील हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. नेवडे फाटा परिसरात रेल्वेमार्गावरील दोन रूळांमध्ये लांब लोखंडी तुकडा आढळून आला. ही घटना सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास उघडकीस आली. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावरून 02821 ही पुणे-सांतरागाछी एक्स्प्रेस सोमवारी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास जात होती. ही एक्स्प्रेस नेवडे फाटा परिसरात आली असता एक्स्प्रेसचे मोटरमन पाटील यांना गाडीखाली जड वस्तू अडकल्याचे आढळून आले. मोठ्याने आवाज येऊ लागल्यामुळे पाटील यांनी तातडीने गाडी थांबवली आणि गाडीखाली उतरून पाहिले असता दोन रेल्वे रुळांच्या मध्ये लांबलचक लोखंडी रुळाचा तुकडा पडल्याचे आढळून आले. इंजिनच्या पुढील बाजूस तो तुकडा अडकल्यामुळे आवाज येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

उभ्या रेल्वे ट्रॅकवर आडवा ट्रॅक, मुंबईत जनशताब्दी पाडण्याचा प्रयत्न?

काही दिवसांपूर्वी जनशताब्दी एक्सप्रेसच्या मार्गावरही अशाप्रकारे लोखंडी तुकडा टाकलेला आढळून आला होता. मात्र, मोटरमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठा अपघात टळला होता. ही घटना अजून ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यामुळे रेल्वे मार्गांच्या आणि त्यावरून धावणाऱ्या गाड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रेल्वे दहशतवाद्यांच्या टार्गेटवर?

गेल्या महिन्यात ओडिशाच्या सीमेजवळ असलेल्या आंध्र प्रदेशमधील कुनेरु स्टेशनजवळ जगदलपूर-भुवनेश्वर एक्सप्रेसचे 8 डबे रुळावरुन घसरले होते. या रेल्वे अपघातात 39 पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला होता. कानपूरमध्येही नोव्हेंबरमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेमागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंदूर-पटना एक्स्प्रेसचा 20 नोव्हेंबर 2016 रोजी कानपूरच्या पुखराया स्टेशनजवळ भीषण अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. संबंधित बातम्या :

हिराखंड एक्स्प्रेसचे 8 डबे घसरुन 39 प्रवाशांचा मृत्यू

पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे घसरले, 63 प्रवाशांचा मृत्यू

‘डबे घसरले नि डोळ्यादेखत त्या चिमुरडीच्या शरीराचे दोन तुकडे’

जखमेवर मीठ, कानपूर ट्रेन दुर्घटनेतील जखमींना जुन्या नोटा वाटप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget