Nashik News : दारुड्यांची तक्रार, पण पोलिसच 'टाईट'; नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी
Maharashtra Nashik News : नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी, दारुड्यांच्या तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांसमोर प्रकार उघड, मद्यधुंद पोलिसांनी मारहाण केल्याचाही स्थानिकांचा आरोप
Maharashtra Nashik News : दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांची तक्रार करण्यासाठी पोलीस ठाणं गाठावं तर पोलिसच दोन तीन पेग मारून टाईट झालेले सापडावेत, हा अनुभव आहे नाशिककरांचा. नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीत पोलीसच ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आलेत. परिसरातील टवाळखोर दारु पिऊन धिंगाना घालत होते. याची तक्रार करण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस चौकीत गेले. यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले. या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
गंगापूर रोड परिसरातील स्थानिक नागरिक दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या टवाळखोरांची तक्रार करण्यासाठी नाशिककरांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी. के. नगर पोलीस चौकी गाठली. तर तिथे पोलिसच दारुची पार्टी झोडताना आढळून आले. हा सगळा प्रकार स्थानिकांनी त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. मोबाईल शुटिंग सुरु होताच पोलिसांना धूम ठोकण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. मद्यधुंद अवस्थेतील पोलिसांनी एका नागरिकाला मारहण केल्याचा देखील आरोप होतो. आता या दारूड्या पोलिसांवर काय कारवाई होते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ : नाशिक चौकीतच पोलिसांची दारु पार्टी, सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद
स्थानिकांनी पोलीस स्थानकातील हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यास सुरुवात केल्यानंतर, पोलिसांनी तिथून पळ काढण्यास सुरुवात केली. एवढंच नाहीतर आक्रमक होत त्यांनी एका नागरिकाला मारहणही केली, असा दावा स्थानिक करत आहेत. दरम्यान, जनतेचं रक्षण करणारे पोलीस स्थानकातच जर दारु पिऊन धिंगणा घालणार असतील, तर सर्वसामान्यांनी आपल्या समस्या, तक्रारी नेमक्या मांडायच्या कुठे? असा प्रश्न स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Nashik : महापौर, भाजप शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल, कार्यक्रमासाठी परवानगी घेतली नसल्याचा नाशिक पोलिसांचा दावा
- धक्कादायक! एमबीबीएसचा पेपर लातुरात फुटला, विद्यापीठाला दिलेल्या पेपरचीच चार महिन्यांपूर्वी सराव परीक्षा घेतल्याचे झाले उघड
- Untimely rain : राज्यातील अनेक भागात अवकाळी आणि गारपीट, कांदा, गहू, हरभरा यासह मका आणि टामॅटोला फटका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha