एक्स्प्लोर
Advertisement
समृद्धी महामार्गावरुन शेतकरी आक्रमक, नाशिक दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना 'रक्त'पत्र
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी हे पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात विरोधाचे सूर उमटले आहेत.
नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस आज नाशिक दौऱ्यावर असताना शिवडे गावातील शेतकऱ्यांनी स्वत:च्या रक्ताने समृद्धी महामार्गाच्या विरोधासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात विरोधाचे सूर उमटले आहेत.
राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी जे निकष लावले आहेत, त्याविरोधात नाशिकच्या नैताळे गावात बंद पाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील दौरा संपवून परतल्यानंतर गावातील रस्ते गोमूत्र आणि दुधाने धुतले जातील असंही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी प्रशासनाकडून काल शनिवारी समृद्धी महामार्गासाठीची पहिली जमीन खरेदी करण्यात आली. सिन्नरमधील एका महिलेकडून ही जमीन खरेदी करण्यात आली आहे. तसंच 10 जणांचं खरेदीखतही झाल्याचं सांगितलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून मोजणी सुरु केल्याने रोष व्यक्त केला जात आहे. मुंबई-नागपूर हा समृद्धी महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांशी प्रकल्प आहे. या महामार्गासाठी सरकारने जमीन संपादन करण्यास सुरुवात केली. पण कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय हे संपादन होत असल्याचा दावा प्रकल्पग्रस्तांनी केला आहे.
- जमीन एकूण वन जमीन 399 हेक्टर एकूण शेत जमीन 17499 हेक्टर पडीक जमीन 2922 हेक्टर एकूण जमीन 20820 हेक्टर
- खर्च बांधकाम 24 हजार कोटी आर्थिक अधिभार 6 हजार कोटी भूसंपादन 13 हजार कोटी इतर 3 हजार कोटी एकूण खर्च 46 हजार कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement