एक्स्प्लोर

Corona Virus | कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये 2,592 लोकांचा मृत्यू

1.1 कोटी लोकसंख्या असलेलं वुहान शहर कोरोना व्हायरसचं केंद्र आहे. या शहराला वेगळं करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी शहर 23 जानेवारीपासून बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच येथे दुसऱ्या शहरातून लोकांना येण्यासही बंदी करण्यात आली आहे.

बिजिंग : चीनमध्ये घातक कोरोना व्हायरसने आणखी 150 लोकांचा बळी घेतला असून यामळे मृतांचा आकडा दोन हजारांवर पोहोचला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमधील 2,592 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 77,000 पेक्षा अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान, विश्व स्वास्थ संस्थेच्या (WHO)तज्ञांनी चीनमधील हुबेई प्रांताची राजधानी असलेल्या वुहान शहराचा दौरा केला.

मीडिया रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसमुळे वुहान शहर सोमवारी एक महिन्यांचा बंद संपवण्याचा निर्णय घेतला आणि तीनच तासात आपला निर्णय मागेही घेतला. तसेच वुहान येथील स्थानीय प्रशासनाने आधी घोषणा केली होती की, ज्या व्यक्ती संक्रमित नसून शहरात अडकल्या आहेत, त्या शहर सोडून जाऊ शकतात.

वुहान शहराला करण्यात आलं वेगळं

दरम्यान, 1.1 कोटी लोकसंख्या असलेलं वुहान शहर कोरोना व्हायरसचं केंद्र आहे. या शहराला वेगळं करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळे संक्रमण पसरण्यापासून रोखण्यासाठी शहर 23 जानेवारीपासून बंद ठेवण्यात आलं आहे. तसेच येथे दुसऱ्या शहरातून लोकांना येण्यासही बंदी करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : कोरोना विषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार

त्यानंतप कोरोना वेगाने संपूर्ण हुबेई प्रांतात पसरला असून या शहराची लोकसंख्या पाच कोटी आहे. वुहान शहर हुबेई प्रांताची राजधानी आहे. राज्यातील 18 पेक्षा अधिक शहरांना सील करण्यात आलं आहे. तेव्हापासून अनेक विदेशी नागरिक, मुख्यतः विद्यार्थ्यांसह अनेक निवासी नागरिकांना शहर सोडण्याची परवानगी नाही.

भारताने आपल्या नागरिकांना चीनमधून मायदेशी आणलं

भारताने विशेष विमान पाठवून 647 भारतीय नागरिक आणि मालदिवच्या सात नागरिकांना चीनमधून मायदेशी आणलं आहे. अजूनही 100 पेक्षा जास्त भारतीय नागरिक चीनमध्ये अडकलेले आहेत. पुन्हा विशेष विमान पाठवून नागरिकांना आणण्यासाठी भारत परवानगीच्या प्रतिक्षेत आहे.

चीनच्या राष्ट्रीय स्वास्थ आयोग (एनएचसी)ने सांगितलं की, 31 प्रांतात रविवारी कोरोनाचे 409 रूग्ण समोर आले आहेत. तसेच 150 लोकांचा मृत्यू झाला आहे. एनएचसीने सांगितलं की, चीनमध्ये एकूण 77,150 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच 150 पैकी 149 लोकांचा मृत्यू हुबेई प्रांतात झाला आहे. तर एका व्यक्तीचा मृत्यू हैनान प्रांतात झाला आहे. एनएचसीने असा दावा केला आहे की, कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांमध्ये कमतरता येत आहे.

पाहा व्हिडीओ : जगभरात कोरोनाचा हाहाकार, देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम

चीनच्या वुहान येथे 30 डिसेंबर 2019मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. स्थानिक मासळी बाजारातून सात रुग्ण आले होते. या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले होते. त्यांनी या आजाराचं निरिक्षण केल्यानंतर हा कोरोना व्हायरस असल्याचं त्यांना आढळून आलं. गेल्या महिन्याभरापासून चीनमध्ये या आजाराने आतापर्यंत हजाराहून अधिक जणांचे बळी घेतले आहेत. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये तब्बल 24 हजार जणांचा मृत्यू झाल्याचा दावा तैवानच्या एका वृत्तसंस्थेने केला आहे. चीन मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

कोरोना व्हायरसवर औषध सापडल्याचा दावा

थायलंडमधील आरोग्य मंत्र्यांनी कोरोना व्हायरस बाबत एक मोठं वक्तव्य केलंय. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका चीनी महिलेवर थायलंडमधील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महिलेवर उपचार करणारे थाय डॉक्टर क्रिएंगसक एटिपोर्नवानिच यांनी रविवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की 71 वर्षीय आजारी महिलेला अॅन्टी-वनायरलच्या कॉम्बिनेशनने तयार करण्यात आलेल्या औषधाचा फायदा झाला आहे. या औषधाचा ताप आणि एचआयव्हीच्या उपचारांमध्ये वापर करण्यात येत असलेल्या अॅन्टी-वायरल कॉकटेलपासून तयार करण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

लक्षणे कोणती आहेत ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

काय काळजी घ्याल?

तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.

संबंधित बातम्या : 

जपानमध्ये क्रूजवर 130 हून अधिक भारतीय अडकले, क्रूजमधील 40 प्रवाशांना कोरोना व्हायरसचा संसर्ग

कोरोना व्हायरसचा सर्वप्रथम धोका सांगणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू

Corona virus | कोरोना व्हायरसवर औषध सापडलं; थायलंडमधील डॉक्टरांचा दावा

Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेकडून आंतरराष्ट्रीय आणीबाणी घोषित

केरळमध्ये कोरोना व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, मुख्यमंत्र्यांकडून राज्य आपत्तीची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget