एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आसाराम बापूच्या आश्रमाचं अतिक्रमण जमीनदोस्त, तुकाराम मुंढेंची कारवाई
गोदावरी काठावर असणाऱ्या आसाराम बापूच्या आश्रमाचं अनधिकृत बांधकाम महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आलं.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमध्ये अतिक्रमण हाटव मोहिम सुरु केली आहे. गोदावरी काठावर असणाऱ्या आसाराम बापूच्या आश्रमाचं अनधिकृत बांधकाम महापालिका अतिक्रमण विरोधी पथकाकडून जमीनदोस्त करण्यात आलं.
शहरात सर्वत्र अतिक्रमण विरोधी मोहिम राबवली जाणार आहे.
आसाराम बापूच्या आश्रमावर अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरु आहे. मात्र कोर्टाने यावर स्थगिती आणली आहे. यावर 28 मे रोजी निर्णय होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
शहरात इतर ठिकाणीही कारवाई होणार
नाशिकच्या सिडको भागातील घरांवर बुलडोझर चालवण्याचा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. सिडकोतील अतिक्रमण विरोधी मोहिमेवरून वाद होण्याची शक्यता आहे.
गोदावरीच्या पूररेषेतील अनधिकृत बांधकामे हटवण्याच्या सूचना मनपाने या आधीच दिल्या होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आसाराम बापू आश्रमापासून पूररेषेतील अतिक्रमण हटवण्यास सुरवात झाली आहे.
दरम्यान, या आधीही आसाराम बापू आश्रमाचं अतिक्रमण काढण्यात आलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement