Nashik News : सुविचार गौरव पुरस्कारांचे अजितदादांच्या हस्ते वितरण; सुरेश वाडकर, गौरव चोपडांसह आठ जणांचा होणार सन्मान
Nashik News : समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या दहा मान्यवरांची 'सुविचार गौरव' पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
Nashik News नाशिक : सुविचार गौरव पुरस्कारांचे (Suvichar Gaurav Award) वितरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि. 04) होणार आहे. पुरस्कारार्थींमध्ये पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar), हिंदी अभिनेते गौरव चोपडा (gaurav chopra) यांचा समावेश आहे.
गुरुवार दि.०४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता महाकवी कालिदास नाट्य मंदिरात (Mahakavi Kalidas Natya Mandir) राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अध्यक्षतेखाली या पुरस्कारांचे वितरण (Awards Distribution) करण्यात होणार आहे. समाजासाठी विविध क्षेत्रात अविरतपणे झटणाऱ्या मान्यवरांची “सुविचार गौरव” पुरस्कारासाठी नावे जाहीर करण्यात आली असल्याची माहिती संयोजक आकाश पगार (Akash Pagar) यांनी दिली.
चार वर्षांपासून दिला जातो पुरस्कार
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून पुरस्कार देण्यात येतात. या वर्षीच्या सुविचार गौरव पुरस्कारांसाठी (Suvichar Gaurav Award) निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींची नावे आज जाहीर करण्यात आली.
यांचा होणार सन्मान
यामध्ये पार्श्वगायक पद्मश्री सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना सुविचार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हिंदी अभिनेते गौरव चोपडा (Gaurav Chopra) यांना सुविचार गौरव या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
समाजासाठी आयुष्यभर कार्य केलेले शेतकरी चळवळीचे नेते रामचंद्रबापू पाटील (सामाजिक), अवयवदान चळवळीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब मोरे (वैद्यकीय), डॉ. शेफाली भुजबळ (शैक्षणिक), जेष्ठ साहित्यिक दत्ता पाटील (साहित्य), उद्योजक चंद्रशेखर सिंग (उद्योग), संगिता बोरस्ते (कृषी), प्रा. नानासाहेब दाते (सहकार), मार्शल आर्ट महिला कुस्ती संघ खेळाडू गौरी घाटोळ (क्रीडा) आदींचा सन्मान होईल.
यांनी केली निवड
आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल तोरणे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ साहित्यिक प्रा. विनोद गोरवाडकर व आय. एम. आर. टी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रशांत सूर्यवंशी हे सदस्य असलेल्या निवड समितीने वरील व्यक्तींची निवड केली आहे.
आणखी वाचा