एक्स्प्लोर

Nashik Leopard News : सर्वत्र नववर्षाच्या स्वागताचा उत्साह; नाशिकमध्ये मात्र बिबट्याची दहशत कायम, घटना CCTV मध्ये कैद

Nashik Leopard News : नाशिक शहरात बिबट्याचे दर्शन होणे हे आता नित्याचेच झाले आहे. आता नाशिकरोडला गुलमोहर कॉलनी परिसरात जवळपास एक तास बिबट्या ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास आले.

Nashik Leopard News : सर्व देशभरात नववर्षाच्या (New Year 2024) स्वागताची जय्यत तयारी सुरु आहे.  कोरोनानंतर (Corona) निर्बंधाशिवाय ‘थर्टी फर्स्ट’ (31st December) आणि नवीन वर्षाचे स्वागत यंदा उत्साहात केले जाणार आहे. सर्वत्र नववर्षाचा उत्साह दिसून येत आहे. मात्र नाशिकमध्ये (Nashik) आज पुन्हा बिबट्याचे (Leopard) दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचे दर्शन होणे हे आता नित्याचेच झाले आहे. आता नाशिकरोडला गुलमोहर कॉलनी (Nashik Road Gulmohar Colony) परिसरात शिवम बंगल्याच्या आवारात काल जवळपास एक तास बिबट्या (Leopard) ठाण मांडून बसल्याचे निदर्शनास आले. इतकेच नव्हे तर या बिबट्याने मांजरीच्या पिल्लाची शिकार केली. त्यानंतर एका बंगल्याच्या आवारात बसून फस्तही केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाली आहे. 

वनविभागाने पिंजरा लावावा

यामुळे परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान या परिसरात नेहमीच बिबट्यांचा वावर दिसून येत असल्याने वनविभागाने याची दखल घ्यावी आणि परिसरात पिंजरा लावात बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.

याच महिन्यात नाशिकमध्ये बिबट्यांचा थरार

दरम्यान, सातपूर मळे परिसरात मागील महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील व्हायरल झाले होते. बिबट्याने काही जनावरांवर हल्ला देखील केला होता. 13 डिसेंबर रोजी सातपूर मळे परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यस आले होते. तसेच गंगापूर रोड परिसरातील रामेश्वर नगर, सिरीन मिडोज, केशर बंगल्या जवळदेखील एका बिबट्याचे दर्शन झाले होते. 

नोव्हेंबरमध्येही दोन बिबटे जेरबंद

शहरातील सिडको आणि गोविंदनगर भागात नोव्हेंबर महिन्यात दोन बिबट्यांचा संचार आढल्याने स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली होती. सिडकोतील रायगड चौकात पहिला बिबट्या आढळला होता. त्यास वनविभागाने जेरबंद केले तर दुसरा बिबट्या गोविंदनगरमधील एका इमारतीत शिरला होता. एका जागरुक डॉक्टरने त्याला खोलीत बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

सकाळी ते डॉक्टर कुत्र्याला घेऊन फिरायला गेले होते. घरी परतल्यानंतर कुत्रा अकस्मात अस्वस्थ झाला. जोरात भुंकू लागला. हे पाहून त्यांनी आपल्या घरातील एका खोलीची पडताळणी केली असता त्यांना बिबट्या दिसून आला. त्यांनी खोली बंद करून वन विभागाला माहिती दिली. वन विभागाच्या पथकाने खोलीच्या भिंतीला भगदाड पाडून बिबट्याला इंजेक्शन दिले. काही वेळात बिबट्या बेशुध्द झाला आणि त्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. 

आणखी वाचा

Nashik News  : थर्टी फर्स्टला तळीरामांवर नाशिक पोलिसांची करडी नजर; ४८ तास बंदोबस्त, 'इतक्या' ठिकाणी नाकाबंदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget