एक्स्प्लोर

Sharad Pawar : पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल, शेतकऱ्यांची मागतली साथ, नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

Sharad Pawar : मोदींची काय गॅरंटी आहे. शेतकरी उत्पन्न वाढले नाही. एकही गॅरंटी पूर्ण नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केली. तसेच्या तुमच्यापासून लढाईची सुरुवात करतोय, तुम्ही साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नाशिकच्या निफाड येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. 

शरद पवार म्हणाले की, निवडणूक दोन-तीन दिवसांत जाहीर होणार आहे. पुढच्या महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. देशात जे चालू आहे जे घडतंय हे लोकांच्या हिताचे नाही. अनेक नेते, राज्यकर्ते बघितले, वैचारिकदृष्ट्या वेगळी भूमिका होती. मात्र लोकशाही टिकली याचा अभिमान देशाला तर आहेच पण जगालाही आहे. 

त्यावेळी  एका आठवड्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ 

नरेंद्र मोदी यांनी काय धोरणे आखली? मनमोहन सिंग यांच्या काळात शेतीचे काम आले. धान्य आयात करण्याची मागणी झाली. धान्य आयात केल्यानं मी व्यथित झालो. स्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी आली, आम्ही त्या कुटूंबाची भेट घेतली. काय झाले विचारलं तर मुलीचे लग्न ठरले, सावकाराचे कर्ज घेतले होते त्याने तगादा लावला. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही एक आठवड्यात शेतकऱ्यांवरील कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे देश परदेशातील धान्य आयात करण्याची वेळ आली नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 

देशाच्या संविधानाची चिंता

मोदींची काय गॅरंटी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले नाही. एकही गॅरंटी पूर्ण नाही, फक्त आश्वासन दिले. राजकारणामध्ये गॅरंटी द्यायची आणि पाळायची नाही. आज सत्तेचा गैरवापर सुरू आहे. महाराष्ट्रात राऊत यांनी लेखणीने सरकार विरोधात लिहिले त्यांना तुरुंगात टाकले. देशमुखांना टाकले, केजरीवाल यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात टाकले. देश वाचवायला हवा. देशाच्या संविधानाची चिंता आहे. देशाची घटना बदलण्यासाठी मोदींना शक्ती पाहिजे, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान मोदींसह शिंदे फडणवीस सरकारवर केली आहे. 

शरद पवारांचे आवाहन 

सर्व लोकांनी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि इतर पक्ष एकत्र आलो आहोत. देशाला पर्याय देऊ असे सांगितले आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून करत आहोत. इथला शेतकरी कष्टकरी आहे. तुमच्या पासून लढण्याची सुरुवात करत आहेत, तुम्ही साथ द्या, असे आवाहन शरद पवारांनी यावेळी शेतकऱ्यांना केले आहे. 

आणखी वाचा 

BJP Candidates List : भाजपकडून लोकसभेसाठी दुसरी उमेदवार यादी जाहीर; खूर्ची सोडलेल्या माजी सीएम खट्टरांना तिकिट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget