एक्स्प्लोर

श्रद्धा जिहादविरोधात हिंदू एकवटले, रणजित सावरकरांकडून त्र्यंबकमध्ये प्रसाद विक्रेत्यांना मिळाले 'ओम प्रमाणपत्र'

Nashik News : वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

नाशिक : वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) परिसरातील प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. राज्यातील सर्वच देवस्थान परिसरात या प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे. प्रसादाची शुद्धता जपली जावी, श्रद्धा जिहादच्या विरोधात हे उचललेलं पाऊल असून हिंदूंच्या भावना आणि श्रद्धा जपली जावी, यासाठी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आल्याचा दावा रणजित सावरकर (Ranjit Savarkar), धर्म अभ्यासक अनिकेत शास्त्री (Aniket Shastri) आणि अभिनेता शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांनी केला आहे. 

ज्या दुकानांना प्रमाणपत्र दिले त्याच दुकानातून वस्तू खरेदी केल्यानं शुद्ध मिळतील, असा त्यांचा दावा आहे. हिंदूंच्या श्रद्धा हिंदुनी जपाव्या, इतरांनी त्यात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका रणजित सावरकर आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मांडल्यानं यातून नव्या वादला तोंड फुटण्याची शक्यता आहे. तसेच सरकारी यंत्रणेवर विश्वास नाही का? असा सवाल यातून उपस्थित होत आहे.

धर्माचार्यांकडून ठरविले शुद्धतेची निकष 

याबाबत रणजित सावरकर म्हणाले की, वेळोवेळी प्रसादात भेसळ होते. गायींच्या चरबीपासून पेढे बनविले जात होते. त्याचे वितरण केले जाते. त्यामुळे शुद्धतेची आवश्यकता आहे. धर्माचार्याकडून शुद्धतेची निकष ठरविले आहे. ओम प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम केले जाणार आहे. आमची राजकारण विरहित संघटना आहे. हिंदूंच्या धार्मिक अधिकाराचे रक्षण करणारी संघटना आहे. 

आमच्या श्रद्धेत हस्तक्षेप करु नका

आम्हाला कोणी अधिकार देण्याची गरज नाही. फूड आणि ड्रग्स विभागाने यावे आणि त्यांनी सांगावे की, हिंदू धर्मानुसार प्रसाद शुद्ध आहे. पण ते करत नाही, त्यामुळे आम्हाला काम करावे लागत आहे. धार्मिक तत्वाची भेसळ असते. आमच्या धर्माला निषिद्ध असणारे तत्व यात आहेत. तुम्ही तुमची श्रद्धा पाळा, आम्हाला आमची श्रद्धा पळू द्या, आमच्या श्रद्धेत हस्तक्षेप करु नका. रोजगार हा सरकारने द्यावा, मुसलमान काय प्रत्येक नागरिकांना रोजगार द्या, प्रत्येक बाबतीत हिंदू-मुसलमान प्रश्न आणू नका. आमचा प्रसाद, पूजा, साहित्य बनविण्याचा अधिकार मुस्लिम लोकांना नाही. 

फूड आणि ड्रग्सकडे धार्मिक निकष नाहीत

आम्ही आमच्या गोष्टीचे रक्षण करणार सरकारला जाग आल्यावर त्यांनी करावे. समाजापुढे आम्ही उदाहरण ठेवत आहेत. त्यावर आमचा अंकूश नाही. हे कोणाला बंधनकारक नाही. फूड आणि ड्रग्सकडे धार्मिक निकष नाहीत, आमचे धार्मिक निकष वेगळे आहेत. यावर क्यूआर कोड आहेत. त्यानुसार विक्रेत्यांविषयी माहिती मिळणार आहे.

आणखी वाचा 

शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा, मराठा आंदोलकांना मुंबई पोलिसांची नोटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  24  डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सParbhani Special Report : मस्साजोग, परभणी प्रकरणात फक्त राजकारण होतंय?Digital Arrest Special Report : 'डिजिटल अरेस्ट'द्वारे कशी होतेय लोकांची फसवणूक?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO Update : DAM Capital च्या आयपीओवर गुंतवणूकदारांचा पैशांचा वर्षाव, 81.88 पट बोली लागली, GMP कितीवर?
IPO Update : DAM Capital च्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांची रांग, GMP किती टक्क्यांवर? 
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वार
लातुरातील बाळू डोंगरे हत्या प्रकरणातील आरोपी डॉक्टर पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Embed widget