Nashik Weather Update : जिल्ह्यातील थंडीचं प्रमाण झालं कमी, काय आहे आजचे तापमान?
Nashik News : नाशिक शहर व निफाड तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड घट झाली होती. त्यामुळे जिल्हाभर थंडीची लाट पसरली होती. यामुळे नागरिक चांगलेच गारठले होते.
![Nashik Weather Update : जिल्ह्यातील थंडीचं प्रमाण झालं कमी, काय आहे आजचे तापमान? Nashik Weather Decrease in cold in the niphad and district Maharashtra marathi news Nashik Weather Update : जिल्ह्यातील थंडीचं प्रमाण झालं कमी, काय आहे आजचे तापमान?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/6de5e604aa1b1b92ccacd07c2e5954c01706513266541923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik Weather Update नाशिक : शहर व निफाड तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात (Temperature) प्रचंड घट झाली होती. त्यामुळे जिल्हाभर थंडीची लाट पसरली होती. निफाडमध्ये (Niphad) तर 4 अंशांवर गेलेला पारा सोमवारी पाच अंशाने वाढत 9.1 अंशांवर गेला आहे. शहरातील किमान तापमानही 12.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. तर 31.4 अंश कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये करण्यात आली आहे. तापमानातील वाढीमुळे नाशिकमध्ये (Nashik) थंडीचे (Winter) प्रमाण काहीसे कमी झाल्याचे जाणवत आहे.
नाशिक शहरात तापमानाने तिशी ओलांडल्याने थंडी संपल्याची सुरुवात मानली जात आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा (Summer) सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहे. सध्या सकाळी कडाक्याची थंडी (Cold) आणि दुपारी ऊन असा अनुभव नाशिकसह जिल्हावासीयांना येत आहे.
तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब
नाशिकमध्ये (Nashik Weather Update) गेल्या आठवड्यात 8 अंशांवर तापमान गेले होते. यात आता तीन अंशांची वाढ होऊन 12.5 अंशांवर गेले आहे. कमाल तापमान 30 अंशांवर गेले आहे. जिल्ह्यात थंडीला काहीशी उशिरा सुरुवात झाली. नागरिकांना गुलाबी थंडीचा अनुभव येत असतानाच तापमानात झालेली वाढ थंडी संपल्याची चिन्हे दिसत आहे.
पुढील दोन आठवड्यांचा थंडीचा अंदाज
दरम्यान, पुढील दोन आठवडे खान्देश, नाशिक, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे ८-१० डिग्री म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा १-२ डिग्रीने कमी असणार आहे. तर दुपारचे कमाल तापमान २६ डिग्री म्हणजे सरासरीपेक्षा २ डिग्रीने कमी असण्याचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी व्यक्त केला आहे.
आगामी काळात नाशिकला कमी थंडीचा अंदाज
नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्रीच्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीपेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल, असेही माणिकराव खुळे यांनी म्हटले आहे.
'या' भागात पावसाची शक्यता
31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तराखंडमध्ये हलक्या स्वरुपातील पाऊस किंवा हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर पुढील दोन दिवस जोरदार सरीसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Shantigiri Maharaj : शांतीगिरी महाराज नाशिकमधून उतरणार लोकसभेच्या आखाड्यात; आज घोषणा करणार?
Nashik Crime News : बेरोजगार मित्राने मैत्रिणीकडून उकळले तब्बल 40 लाख; नाशिकमधील धक्कादायक घटना
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)