Manoj Jarange : "सरकार रात्रीतून काही करतील नेम नाही, माझ्यावर लय वेळा डाव टाकला", पण... मनोज जरांगेचे बांधवाना आवाहन
Nashik Manoj Jarange : सरकार आपल्यात फूट पाडू शकत, मात्र आपल्यात फूट पडू देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी बांधवाना केले आहे.
![Manoj Jarange : nashik latest news We are Kunbi Marathas and we want reservation only from OBC says Manoj Jarange maharashtra news Manoj Jarange :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/09/19cdf2dfbd016a8e8e2bfa514170ec481696827812895738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून आपण एकजुटीने काम करत आलो आहोत. आता आपल्याला आरक्षण (Reservation) मिळाल्याशिवाय मागे हटायचं नाही. हि शेवटची संधी समजा. त्यामुळे सरकार रात्रीतून काय डाव टाकेल सांगता येत नाही, म्हणून जपून राहा. सरकार आपल्यात फूट पाडू शकत, मात्र आपल्यात फूट पडू देऊ नका, असं आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी सकल मराठा समाज बांधवाना केले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj jarange) गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्र दौरा (Maharashtra) करत आहेत. काल सायंकाळी नाशिक शहरात दाखल होत त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांची भेट घेतली. यानंतर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील छत्रपती शिवाजी स्मारकासमोर बसलेल्या उपोषणार्थींची भेट घेत मराठा बांधवाना आवाहन केले. त्याचबरोबर आज येवल्यात सभा होत असून तत्पूर्वी त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. तसेच सरकार आपल्यात फूट पाडू शकतं, पण फूट पडू देऊ नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय. काल रात्री नाशिकच्या (Nashik) सीबीएस परिसरातील भाषणात त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. सरकारला 5 हजार पुरावे मिळाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आरक्षण द्यावेच लागेल, कसं देत नाही ते बघू असं म्हणत त्यांनी सरकारला देखील सुनावले आहे.
मनोज जरांगे यावेळी म्हणाले कि, आपलं आंदोलन शेवटच्या टप्प्यावर आलं असून ही निर्णायक लढाई आपल्याला लढावीच लागेल. मात्र शेवटच्या क्षणी सरकार आपल्या फूट पाडू शकत, ते काहीही डाव टाकतील. रात्रीतून काही करतील नेम नाही, मलाही किती वेळाला डाव टाकला, पण मी बधलो नाही, मी समाजाचे लेकरू म्हणून पुढं आलोय, ते सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. म्हणून तुम्हाला आधीच सांगतोय, सरकारमध्ये लई नमुने असून कोण काय करेल नेम नाही. पण आता तुमच्या पाठिंब्यावरून असं वाटतंय की आता आता नाही फूट पडत. कारण सामान्य मराठ्याने हे आंदोलन हातात घेतले आहे. त्यामुळे आता बैल चोरीला जायच्या आधी गोठ्यात बांधला तर काय होईल, हे लक्षात घ्या... असे कळकळीचे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे...
आम्ही ओबीसी मध्येच (OBC) आहोत, कुणबी मराठा आहोत. त्यामुळे ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे. आणि या मागणीला कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नाही, असे सांगत नियोजित येवला येथील सभेचा रूट ठरला होता म्हणून जातो आहे. येवल्यात जातोय, यात वेगळे काही नाही. समता परिषदेने विरोध केला, हा द्वेष का पसरवित आहेत. याचा अर्थ तुम्ही संविधानिक पदाचा गैर वापर केला जात आहे. एकीकडे चार दिवसांत कायदा पारित होणार नाही, म्हणून आम्ही त्यांना 40 दिवस दिले आहेत. 1 महिना 14 तारखेला पूर्ण होतो आहे, त्यामुळे सरकारने गांभीर्याने घ्यावे, तसं मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मात्र आम्ही ओबीसीमध्येच आहोत, कुणबी मराठा आहोत, त्यामुळे ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, कुणी ओबीसी नेते विरोध करत असतील तर त्याला अर्थ नसल्याचे जरांगे म्हणाले.
इतर महत्वाची बातमी :
Manoj Jarange: अंतरवलीत आमच्यावर हल्ला का केला? मनोज जरांगेचा सवाल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)