एक्स्प्लोर

Manoj Jarange: अंतरवलीत आमच्यावर हल्ला का केला? मनोज जरांगेचा सवाल

मी मरेपर्यंत हटणार नाही. हे पहिलं आणि शेवटचे आंदोलन आता मागे हटायचे नाही . सरकारला पलटी मारायची संधी नाही. जातीशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

नाशिक : अंतरवलीत आमच्यावर हल्ला का केला याचे उत्तर अजूनही सरकार देऊ शकले नाही, असा सवाल  मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  सरकारला केला आहे. पाच हजार पुरावे मिळालेत त्यामुळे आरक्षण (Maratha Reservation) द्यावेच लागेल, सरकार आपल्यात फूट पाडू शकते, ती पडू देऊ नका असे जरांगेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. रविवारी रात्री नाशिकच्या (Nashik News) सीबीएस परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आयोजित भाषणातून समाजबांधवांना करत पाच हजार पुरावे मिळाले आहेत त्यामुळे तुम्हाला आरक्षण द्यावेच लागेल, कसे देत नाही ते बघू असं म्हणत त्यांनी सरकारला इशारा मनोज जरांगे यांनी केला. 

मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. 29 ऑगस्टला  लढाई सुरू झाली.संपूर्ण गावरक्त बंभाळ झाले होते . अनेक महिला आपल्याला आरक्षण नको पण माझ्या नातवाला काम येईल म्हणून तिथं होत्या. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते.  चार महिन्यांचे लेकरू असतांना आईचे डोकं फुटलं . त्या आईचे रक्त मुलाच्या अंगावर पडले होते, काहींचे हात मोडले, पाय मोडले, एका मुलीच्या पायात गोळी घुसली होती. एका मुलाच्या तर छातीत 35 गोळ्या शिरल्या होत्या.तो हल्ला आमच्यावर हल्ला नव्हता तर संपूर्ण मराठा समाजावर होता   आमचं असं काय चुकलं की आमच्यावर प्राणघातक हल्ला केला . शांततेत चाललेल्या आमच्या आंदोलनावर हल्ला का करण्यात आला? असा सवाल मनोज जरांगेंनी केला आहे.   छगन भुजबळांवर देखील नाव न घेता त्यांनी टीका करत मराठा आरक्षणाला विरोध नाही असं त्यांनी म्हणताच आम्ही विषय सोडून दिला पण आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मी सोडणार नाही तो कोणीही असो, मराठ्याची औलाद आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.  

मराठा आरक्षण मागितले ही आमची चूक होती का?

29 तारखेला जे आंदोलन होते त्याच्या आधी आम्ही इशारा दिला होता. मला खुर्चीचा मोह नव्हता, मी व्यासपीठावर गेलो नव्हतो. मी शांत बसा म्हटलो तरी लोक शांत बसत होते. जालन्याचे कलेक्टर आणि एसपी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हंटले असा मॉब शांत करणारा माणूस बघितला नाही असे म्हटले मग आम्ही नंतर कसा काय धिंगाणा केला? मराठ्यांची औलाद कधीच धिंगाणा करू शकत नाही पण सरकारने कधीच खुलासा केला नाही. आम्हाला कुणबी सर्टिफिकेट द्या अशी मागणी केली तर चुकले काय ? आम्ही शांततेत आंदोलन केले ही आमची चूक होती का? 1923 पासून मराठा आरक्षण आहे हे मागितले ही आमची चूक होती का? असा सवाल मनोज जरांगेनी केला आहे. 

जातीशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही

मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाज प्रचंड ताकदीने उतरला आहे.  देशातील एकाही माणसात हे आंदोलन चिरडण्याची  हिंमत नाही. चार दिवसांत आरक्षण देता येणार नाही असे सरकार म्हटले. कायदा टिकला नाहीतर काय करणार म्हणून 40 दिवसांचा वेळ मागितला म्हणून मी सांगितले 40 दिवस देतो. पाच हजार पुरावे त्यांना मिळाले आहे, त्यानुसार आता एकच पर्याय आरक्षण द्या.  मी मरेपर्यंत हटणार नाही. हे पहिलं आणि शेवटचे आंदोलन आता मागे हटायचे नाही . सरकारला पलटी मारायची संधी नाही. जातीशी गद्दारी करणारी माझी पैदास नाही. आमदार आणि मंत्र्यांनी खांद्यावर हात टाकला तरी दुसऱ्या दिवशी नीट सुद्धा बोलत नाही. पण माझ्यासमोर मंत्रिमंडळ बसले होते पण काहीच बदललो नाही.  मला काही नको मी मरणाला भीत नाही.  मला माझ्या समाजाच्या वेदना सहन होत नाही. -17 दिवस उपोषण केले,त्यानंतर डॉक्टर म्हटले आराम करा पण मी थांबलो नाही. वडिलांना सांगितले आलो तर चार मुलं नाहीतर तीनच मुलं त्यावर समाधान माना, रडायचे नाही. बायकोला सांगितले आलो तर ठीक नाहीतर कुंकू पुसून तयार राहायचे.  

हे ही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
शेतकरी दाम्पत्याने चिकननंतर दही खाल्लं, पत्नीचा मृत्यू; 10 दिवसानंतर पतीनेही रुग्णालयात सोडला जीव, गुढ वाढले?
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain: पुणे, सोलापूरकरांना अल्पसा दिलासा, उजनी धरण आलं प्लसमध्ये; रायगडमध्ये 17 धरणे 100 टक्के भरली, तर मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच, खरीप हंगाम संकटात
पुणे, सोलापूरकरांना अल्पसा दिलासा, उजनी धरण आलं प्लसमध्ये; रायगडमध्ये 17 धरणे 100 टक्के भरली, तर मराठवाड्यात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षाच, खरीप हंगाम संकटात
धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना
धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget