Nashik News : मनोज जरांगे यांना पाठींब्यासाठी बडी दर्ग्यावर चढवली चादर, नाशिकमधील सर्वधर्मीय समाज बांधवांकडून दुआ पठण
Nashik News : मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिक शहरातील बडी दर्गा येथे दुवा पठण करण्यात आली
नाशिक : मराठा समाजाच्या (Maratha Reservation) आरक्षणाकरता गेल्या सहा दिवसापासून परत एकदा मराठा समाजाची कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे आणि त्यांच्या या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चांगले आरोग्य मिळावे, आंदोलनासाठी ताकद मिळावी, म्हणून आज नाशिक (Nashik) शहरातील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या माध्यमातून बडी दर्गा (Badi Darga) येथे चादर चढवून दुआ पठण करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या (Maratha Aarkshan) पार्श्वभूमीवर राज्यभरात तीव्र आंदोलने करण्यात येत असून मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) आणि आता पुण्यातही आंदोलनचे लोण पसरले आहे. नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) आंदोलन सुरु असून ठिकठिकाणी रास्ता रोको, निषेध मोर्चे, कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील बहुतांश मुस्लिम समुदायाकडून देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यात आला आहे.. त्याचबरोबर अनेक पक्षांकडून देखील पाठिंबा दर्शवला जात आहे. नाशिक शहर काँग्रेसने देखील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नाशिक शहरातील बडी दर्गा येथे जात दुवा पठण करण्यात आली. त्याचबरोबर दर्ग्यावर चादरही चढविण्यात आली.
आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व त्यांना आंदोलनासाठी ताकद मिळावी म्हणून काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीने शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड (Akash Chajjed) यांच्या नेतृत्वाखाली बडी दर्गा येथे चादर चढवून दुआ पठण करण्यात आले. मराठा समाजाच्या तरुणांकरता आरक्षण मिळावं त्यांचं भविष्य उज्वल व्हावं, म्हणून जरांगे पाटलांचा उपोषण हे महात्मा गांधींच्या मार्गावर आहे आणि समाजाच्या उद्धारासाठी मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलेले आहे त्याला काँग्रेस पक्षातील सर्व विभाग हे पाठिंबा देत असून मनोज जरांगे पाटलांचा आरोग्य चांगलं राहावं त्यांना ताकद मिळावी म्हणून आज चादर चढवण्यात आली. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. मराठा समाज व तसेच इतर समाजालाही आरक्षण मिळावं, म्हणून सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष ठाम भूमिका घेईल, असे मत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
नाशिकमध्ये मराठा समाज एकवटला!
दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात मराठा समाज एकवटला असून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी साखळी उपोषणसह साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहेत. तर बहुतांश गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. नाशिक शहरांमध्ये कॅण्डल मार्च, मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतरग्रामीण भागातील समाज बांधवानी एकत्र येत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. अनेक गावातले आंदोलक या मोर्चा स्थळी एकवटलेले पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले जातात. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्येही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चाचं सहभागी झाल्याचे दिसून आले.
इतर महत्वाची बातमी :