एक्स्प्लोर

Punjab: पंजाबच्या सुवर्ण मंदिराजवळ पुन्हा एकदा भीषण स्फोट, 24 तासांत दोन वेळा स्फोट

Punjab: सकाळच्या सुमारास सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटमध्ये गेल्या 24 तासांत दुसरा स्फोट झाला. जवळजवळ त्याच ठिकाणी काल मध्यरात्री स्फोट होऊन सहा जण जखमी झाले होते.

Amritsar: पंजाबमधील (Punjab) अमृतसरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाला आहे. सुवर्ण मंदिराजवळ (Golden Temple) सकाळच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट बॉम्बमुळे झाला की अन्य कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण सर्वात मोठी बाब म्हणजे हा स्फोट सलग दुसऱ्या दिवशी झाला आणि सुवर्ण मंदिराजवळच झाला आहे.

मध्यरात्री झालेल्या स्फोटानंतर सकाळी सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटवर स्फोट झाला. मात्र, हा दुसरा स्फोट किरकोळ असल्याचा दावा करण्यात आला. आश्‍चर्याची बाब म्हणजे, एक दिवस आधी (रविवारी) जिथे स्फोट झाला त्याच ठिकाणी आज सकाळी (सोमवारी) स्फोट झाला. सोमवारची सकाळ असल्याने कमी वर्दळीमुळे या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर शनिवार आणि रविवार दरम्यान रात्री झालेल्या स्फोटामध्ये सहा जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेरीटेज स्ट्रीटवरील (Heritage Street) एका रेस्टॉरंटच्या चिमणीत आधी स्फोट झाला होता, त्या स्फोटाप्रमाणेच हा स्फोट असावा. जवळपास त्याच ठिकाणी हा दुसरा स्फोट झाला आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकारी, बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, दोन्ही स्फोटांबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. आम्ही घटनेचा तपास करत असून यात एकजण किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरा स्फोट हा सोमवारी सकाळी 6.30 च्या सुमारास झाल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

सुवर्ण मंदिराजवळील (Golden Temple) हेरिटेज स्ट्रीटवर शनिवारी मध्यरात्री झालेल्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, हा दहशतवादी हल्ला नसून केवळ अपघात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तरीही, आसपासच्या परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू लपवून ठेवल्याच्या भीतीने परिसराची झडती घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. शोधमोहिमेसाठी (Search Operation) पोलिसांनी रस्त्याची एक बाजूही बंद केली आहे.

अमृसरमधील (Amritsar) स्फोटामुळे जवळपासच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचा उडाल्या. अमृतसरचे पोलीस आयुक्त नौनिहाल सिंग यांनी ट्विट केले की, "घटनेतील तथ्ये तपासली जात आहेत आणि घाबरून जाण्याची गरज नाही." त्याच प्रमाणे, नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणतीही पोस्ट किंवा व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी वस्तुस्थिती तपासण्याचे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

हेही वाचा:

Maharashtra News: धक्कादायक! राज्यात रोज सरासरी 70 तरुणी होतायत बेपत्ता, मार्च महिन्यात 2200 मुली गायब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget