एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकची सीमा हैदर? मालेगाव शहरातील महिला एटीएसच्या रडारवर, काय आहे नेमकं प्रकरण? 

Nashik News : नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथील असलेली एक महिला पाकिस्तानी नागरिकाशी पुनर्विवाह करून पुन्हा भारतात परतली आहे.

नाशिक : सीमा आणि सचिन (Seema Haidar) प्रकरण माहित नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. असंच काहीसं प्रकरण नाशिकमधून (Nashik) समोर आलं आहे. नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथील असलेली एक महिला पाकिस्तानी नागरिकाशी पुनर्विवाह करुन पुन्हा भारतात परतली आहे. सध्या या 32 वर्षीय विवाहित महिलेचा राज्याचे दहशतवाद विरोधी पथक केंद्रीय यंत्रणांकडून तपास केला जात असून एटीएसने याप्रकरणी महिलेचा जबाब नोंदवल्याचे समोर आले आहे. 

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai Airport) सुरक्षा देणाऱ्या सीआयएसएफ दल आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांना अलीकडेच एक धमकीचा निनावी ई-मेल प्राप्त झाल्यानंतर तपास सुरु करण्यात आला. व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा आधारे एक भारतीय महिला एका पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले. या पाकिस्तानी (Pakistan) कुटुंबातील सदस्य पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयमध्ये कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एटीएसच्या अधिकाऱ्यांनी महिलेची झाडाझडती घेतली असून एका पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले आहे. पाकिस्तानी नागरिकाशी पुनर्विवाह करुन नुकतीच परतल्याची ATS ची माहिती असून ATS ने या प्रकरणी महिलेचा जबाब नोंदवला असून मालेगावात पालकांच्या सोबत राहत असल्याचे समोर आलं आहे.  

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा देणाऱ्या सीआयएसएफ दल आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांना अलीकडेच एक धमकीचा निनावी ई-मेल प्राप्त झाल्यानंतर तपास सुरु करण्यात आला. व्हर्च्युअल कम्युनिकेशनचा आधारे एक भारतीय महिला पाकिस्तानी एका पाकिस्तानी नागरिकाला भेटल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तपासात ही महिला छत्रपती संभाजी नगर (Chatrapati Sambhajinagar) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या व्यापारी पतीने डिसेंबर 2022 मध्ये स्थानिक सिडको पोलीस ठाण्यात तिच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. एटीएसने महिलेच्या पतीचा जबाब नोंदवला असून ती महिला 4 ऑगस्टपासून मालेगावमध्ये तिच्या पालकांसोबत राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. एटीएस अधिकारी महिलेच्या परदेशी प्रवासाच्या इतिहासाची पडताळणी करत आहेत. तसेच संशयित महिला कोणत्याही भारतविरोधी कारवायांमध्ये सामील आहे की नाही, याचा तपासही एटीएस करीत आहे

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद शहरातील संबंधित विवाहित महिलेची सोशल मीडियावर विदेशी तरुणासोबत ओळख झाली होती. पुढे ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे डिसेंबर महिन्यात ही महिला प्रियकराच्या मदतीने सौदीला गेली. या प्रकरणी तिच्या पतीने पोलीस ठाण्यात नोंद केली. या काळात काही महिने ती सौदी अरेबिया आणि इतर देशांमध्ये राहिली. दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती पुन्हा भारतात परतली. पण औरंगाबादला पतीच्या घरी न जाता नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील माहेरी आली. सध्या ती तेथेच राहत आहे. असे असतानाच औरंगाबाद पोलिसांना या महिलेबाबत 28 ऑगस्टला एक ई मेल प्राप्त झाला आहे. विदेशात गेल्यावर ही महिला देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आल्याचे समजतंय. 

इतर महत्वाची बातमी : 

औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
Embed widget