Ajit Pawar Nashik : शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत अजित दादांचा कृषीबहुल भागाचा दौरा, नाशिकसह दिंडोरी कळवणला भेटी
Ajit Pawar Nashik : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात नाशिक ग्रामीण भागात विशेष लक्ष असणार आहे.
नाशिक : आगामी निवडणुकांच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे (Maharashtra Tour) सातत्याने दौरे सुरू आहेत. त्यातच नाशिक (Nashik) जिल्ह्यात राजकीय केंद्र बनू पाहत आहे. अशात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच नाशिक ग्रामीण भागात विशेष लक्ष असणार आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे 'शासन आपल्या दारी' या सरकारी कार्यक्रमासाठी एकदा नाशिकमध्ये आले होते. त्यांनतर आज ते शरद पवारांच्या (Sharad awar) पावलावर पाऊल टाकत कृषी बहुल क्षेत्रातील भागाचा दौरा करणार आहेत.
काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात राजकीय नेत्यांची उठबस वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) नाशिक दौऱ्यावर आले होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष बांधणीसाठी नेत्यांचे दौरे होत आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्यात दौरा करत आहेत. यात विशेषतः ग्रामीण भागात लक्ष केंद्रित केल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर अजित पवार हे 'शासन आपल्या दारी' सरकारी कार्यक्रमासाठी एकदा नाशिकमध्ये आले होते. मात्र पक्ष कामकाजाच्या दृष्टीने त्यांचा हा पहिला दौरा मानला जात आहे. जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि बहुतांश पदाधिकारी दादा गटात सहभागी झाले आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने दादांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिकमध्ये येत आहेत.
'असा' आहे दौरा कार्यक्रम
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार ओझर विमानतळावर दाखल होणार आहेत. या ठिकाणी नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्या हस्ते स्वागत करण्यात येईल. त्यानंतर शासकीय वाहनाने ते दिंडोरी शहराकडे जाणार आहेत. तालुक्यातील अवनखेड येथील भक्त निवासचे उदघाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर लखमापूर फाटा, वणी चौफुली मार्गे नांदुरी कळवणकडे प्रस्थान करतील. त्यानंतर कळवण (Kalwan) शहरात आगमन झाल्यानंतर साडे अकरा वाजता शेतकरी कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमानंतर राष्ट्रवादीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री ऍग्रो फार्म हाऊस या ठिकाणी संवाद साधणार आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाशिक शहरात आगमन होणार असून राष्ट्रवादी भवन कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत. यानंतर पुन्हा शासकीय वाहनाने पुन्हा ओझर विमानतळाकडे प्रस्थान करतील. असा त्यांचा एकूण दौरा असणार आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :