Uddhav Thackeray At Ozar Airport : ओझर विमानतळावरुन उद्धव ठाकरे मालेगावकडे रवाना
उद्धव ठाकरे काही वेळापूर्वी ओझर विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर लगेचच मालेगावकडे रवाना झालेत... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होतेय... आणि या सभेत ठाकरी तोफ कधी धडाडणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेत... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात आहे... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणाराय... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारले असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीये... ओझर विमानतळावरुन उद्धव ठाकरे मालेगावकडे रवाना झालेत..थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभास्थळी दाखल होतील..























