एक्स्प्लोर

Breaking News : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही जातनिहाय गणना होणार? चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी मागणी

Chandrashekhar Bawankule On OBC : भाजपचा आजपासून ओबीसी जागर मोर्चा सुरू असून त्यामध्ये आशिष देशमुखांनी बिहारप्रमाणे राज्यातही ओबीसी जनगणना करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

नागपूर: बिहारनंतर (Bihar Caste Census) महाराष्ट्रात आता जातनिहाय जनगणना होणार का असा प्रश्न विचारला जात आहे. सत्तेत असलेले शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादीची महायुती सरकार यावर काय भूमिका घेणार हे अद्याप स्पष्ट नाही. पण यातील भाजपकडून आपली भूमिका काय असेल हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यातील ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे करणार असल्याची मोठी घोषणा बावनकुळे यांनी केली आहे. भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत त्यांनी ही घोषणा केली. 

बिहारमध्ये नीतीश कुमार सरकारने जातनिहाय जनगणनेचा अहवाल जारी केला आहे. बिहारमध्ये ओबीसींच्या जातनिहाय गणनेचा अहवाल सादर होताच राज्यात भाजपच्या ओबीसी जागर यात्रेत महाराष्ट्रात ही ओबीसींची जात निहाय गणना करावी अशी मागणी करण्यात आली. यात्रेत उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पक्ष म्हणून महायुती सरकारकडे ओबीसींची जात निहाय गणना करण्याची मागणी करेल असे जाहीर केले.

Ashish Deshmukh On OBC : आशिष देशमुख यांची मागणी काय?

बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसीच्या विविध जातींचा सर्वे करावा अशी मागणी भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. ते म्हणाले की, "आताच बिहार सरकारने ओबीसींच्या गणनेचे आकडे जाहीर केले आहे. मी बावनकुळे यांच्याकडे मागणी करतो की आधीच महाराष्ट्र विधानसभेने एकमुखाने ओबीसी आणि इतर जातीच्या गणण्याची मागणी केलेली आहे. बिहारच्या या जातनिहाय गणनेनंतर बावनकुळे यांना विनंती आहे, आपण सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसी मधील विविध जातींचा सर्वे करून आकडे जाहीर करण्याची मागणी सरकारकडे करावी."

Chandrashekhar Bawankule On OBC Caste Census : बावनकुळे यांचे उत्तर काय?

आशिष देशमुख यांनी ओबीसी जनगणनेची मागणी केल्यानंतर त्याला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "बिहारचा जो रिपोर्ट आज आला आहे, त्यानंतर आशिष देशमुख यांनी मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने ओबीसींचा सामाजिक आर्थिक स्टॅटिस्टिक डेटा जाहीर करावा. ओबीसींची संख्या किती आहे याचा डेटा राज्य सरकारने सर्वे तयार करून तो जाहीर करावा, यासंदर्भात आम्ही राज्य सरकारला विनंती करू."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेटSanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाहीAjit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलंSharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी
Kurla BEST Bus Accident: 'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
'हाथ मे गोल्ड है'; कुर्ला अपघातानंतर हेल्मेट घातलेल्या तरुणानं सर्वांसमोरच मृत महिलेच्या बांगड्या चोरल्या
Video : भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
नितीश राणा-आयुष बदोनी यांच्यात भरमैदानात वाद, अम्पायरची मध्यस्थी, पाहा व्हिडीओ
Sushma Andhare: परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
परभणीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली आंबेडकरी पिढ्या बर्बाद करण्याचा प्रयत्न? सुषमा अंधारेंचे सरकारवर ताशेरे
Sharad Pawar & Ajit Pawar: अजित पवारांनी शरद पवारांची भेट का घेतली, भाजपला मोठा मेसेज देण्याचा प्रयत्न?
शरद पवारांची भेट घेऊन अजितदादांनी एकदा दगडात अनेक पक्षी मारले , नेमका कोणता पॉलिटिकल मेसेज दिला?
Sharad Pawar : आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
आतल्या गोटातून मोठी बातमी, 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल अन् शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
Embed widget