एक्स्प्लोर

Nashik News : बसस्थानकांवर चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद; चार तरुणी ताब्यात, दोन अल्पवयीन मुलींचा समावेश 

Nashik News : गर्दीचा फायदा घेत शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात मुंबई नाका पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चार तरुणींना अटक करण्यात आली आहे.

Nashik Crime News नाशिक : गर्दीचा फायदा घेत शहरातील बसस्थानकांवर प्रवाशांच्या बॅगेतून दागिने चोरणाऱ्या टोळीस जेरबंद करण्यात मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या (Mumbai Naka Police Station) अधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी चार तरुणींना अटक करण्यात आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. या संशयित तरुणी जालना, संभाजीनगर परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस (Police) तपासात आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संजना रोहन शिंदे (19, रा. मिटमिटा झोपडपट्टी, संभाजीनगर), फरिना जय सोनवणे (19, रा. वजीरखेडा, भोकरदन ता. जि. जालना) अशी संशयित तरुणींची नावे आहेत. त्यांच्यासह बोईसर आणि पंचवटीतील 15 वर्षींय मुलींनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

महामार्ग बसस्थानकातून लांबवली सोन्याची पोत

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता राजेंद्र पाटील (50, रा. होळ, ता. शिंदखेडा जि. धुळे) या गेल्या गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास महामार्ग बसस्थानकातून (Mahamarg Bus Stand) कसारा-नाशिक बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या पोत संशयितांनी लांबवली. काही मिनिटांत ही बाब त्यांच्या लक्षात आली. 

चार तरुणींना पोलिसांनी घेतले ताब्यात

त्यांनी आरडाओरड करुन घटनेची माहिती सर्वांना दिली. यानंतर मुंबई नाका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बसस्थानकासह उभ्या असलेल्या बसेसमध्ये संशयितांचा शोध सुरू केला. गुन्हेशोध पथकाचे हवालदार राजू टेमगर, अंमलदार सागर जाधव, राजेंद्र नाकोडे व महिला अंमलदारांनी काही मिनिटांत संशयावरुन बसस्थानकातूनच दोघींना ताब्यात घेतले. तेव्हा दोघींनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अंमलदार समाधान धीवर, महिला अंमलदार एम. व्ही. लांडगे यांनी उर्वरित दोघा अल्पवयीन मुलींना बसस्थानकाजवळून ताब्यात घेतले. 

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

या चारही संशयित मुलींना मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनी चौकशी केली. यात दोन तरुणींनी गर्दीचा फायदा घेत चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 15 हजार रुपये किमतीचे दागिने पोलिसांनी जप्त केले.  अल्पवयीन संशयित मुलींना नोटीस देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित दोघींकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Dhule News : तोतया जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती वाढली, धक्कादायक माहिती समोर

अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करु देणार नाही; स्थानिकांचा आक्रमक पवित्रा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Vs Yashomati Thakur | नवनीत राणांकडून यशोमती ठाकूर यांचा नणंदबाई असा उल्लेखTOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07.30 PMABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 07 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha 07 Nov ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Embed widget