Dhule News : तोतया जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती वाढली, धक्कादायक माहिती समोर
Dhule News : जिल्ह्यात गाजलेल्या कथित जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी अनेक धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
Dhule News धुळे : जिल्ह्यात गाजलेल्या कथित जीएसटी अधिकारी प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) आतापर्यंत केलेल्या तपासात टोळीने चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. तसेच पोलिसांकडून संशयितांनी हाताळलेली 16 बँक खाते सील करण्यात आले आहेत.
धुळे जिल्हा पोलीस दलातील बिपिन पाटील (Bipin Patil) आणि इमरान शेख (Imran Shaikh) हे दोन कर्मचारी महामार्गावर जीएसटी अधिकारी (GST Officer) भासवून व्यापारी आणि ट्रक चालकांना गंडा घालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी चंदिगड येथील काश्मीर सिंग बाजवा यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
16 बँक खाती, चार कोटींचा गंडा घातल्याचे उघड
या तक्रारीनंतर कर्मचारी बिपीन पाटील आणि इमरान शेख या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर सुरुवातीला 73 लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले होते. यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात आतापर्यंत चार कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या संस्थेने हाताळलेली 16 बँक खाती पोलिसांकडून सील करण्यात आली आहे.
संशयितांना पोलीस कोठडी
या प्रकरणातील पोलीस कर्मचारी बिपीन पाटील इमरान शेख विनय बागुल आणि स्वाती पाटील यांची पोलीस कोठडी देण्यात आला आहे. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ही बँक अकाउंटमध्ये गुगल पे आणि फोन पे द्वारे ट्रान्सफर करण्यात येत होती. या प्रकरणातील संशयित पोलीस कर्मचारी बीके पाटील इमरान शेख यांना धुळे न्यायालयात हजर केल्यावर त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली असून स्वाती पाटील यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
सर्व संभाषण व्हॉट्सअॅपद्वारे
अखेरीस तडजोडीअंती 1 लाख 30 हजार रूपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम गुगल पे वरून बिपीन पाटील यांची नाशिक येथील त्याची बहिण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आली होती. गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आले होते.
बडे मासेही अडकण्याची शक्यता
बिपीन पाटील हा निजामपूर पोलिसात एएसआय पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे निजामपूर पोलीस ठाण्याचे शासकीय वाहन असून तो त्याच वाहनाद्वारे साथीदारांसह महामार्गावर जीएसटी अधिकारी बनून लूटमार करत होता. यात बडे मासेही अडकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
आणखी वाचा
रवींद्र जाडेजाच्या घरात कौटुंबिक वाद उफाळला, आमदार सूनेवर वडिलांचे मोठे आरोप