नाशिकच्या देवळा तालुक्यातील 16 महिन्यांच्या चिमुकल्याने सर केला शिवेनरी किल्ला, छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन
Nashik News : दीड वर्षाच्या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला सर करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनोखे अभिवादन केले आहे. या चिमुकल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Nashik News देवळा : खेळण्या-बागडण्याच्या वयात अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्याने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) सर करत शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अनोखे अभिवादन केले आहे. नाशिकच्या (Nashik) उमराणे गावातील शिवार्थ उर्फ रायबा देवरे (Shivarth Deore) याने किल्ल्याच्या पायथ्यापासून तब्बल ६ तास २७ मिनिटे चालून शिवाजी महाराजांचे शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ गाठले. त्यामुळे रायबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
वडील सचिन देवरे (Sachin Deore) आणि आई स्नेहल देवरे (Snehal Deore) यांनी रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर नेण्याचा मानस ठेवला होता. त्यानुसार शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा संकल्प त्यांनी पूर्ण केला.
देवळा तालुक्यातील चिमुकल्याने सर केला शिवनेरी किल्ला
6 जून 2022 रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या मूहूर्तावर जन्मलेला शिवार्थ देवरे (उर्फ रायबा) हा मुळचा नाशिकच्या देवळा तालुक्यातील उमराणे (Umrane) येथील आहे. या बालकाला लहानपणापासूनच शिवरायांबाबत विशेष प्रेम असल्याचे रायबाचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी असलेली विशेष ओढ लक्षात घेता वडील सचिन देवरे आणि आई स्नेहल देवरे यांन रायबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti 2024) शिवरायांचे जन्मस्थळ असलेल्या नेण्याचा मानस ठेवला.
6 तास 27 मिनिटात चिमुकला पोहचला शिवनेरीवर
यासाठी लागणाऱ्या सर्व कागदोपत्री परवानगींची त्यांनी पुर्तता केली. काही डॉक्टरांना (Doctor) सोबत घेतले. यापूर्वी काही दिवस रायबाचा चालण्याचा सराव करुन घेण्यात आला. त्यानुसार आई, वडील, डॉक्टर तसेच काहीं जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत रायबाने शिवनेरीवर (Shivneri) चढण्यास सुरुवात केली. तब्बल 6 तास 27 मिनिटात हा चिमुकला शिवनेरीवर पोहचला आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
रायबावर कौतुकाचा वर्षाव
त्याठिकाणी असलेल्या विशेष पथकाने देखील त्याचे स्वागत करीत त्याच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मस्थळ असलेली महल उघडून दिला. रायबाने देखील मोठ्या अदबीने आतमध्ये प्रवेश करीत त्या जागेला मानाचा मुजरा केला. परतीचा प्रवास एक तास ३७ मिनिटात रायबाने पूर्ण केला. रायबाने शिवनेरी सर केल्याने त्याच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत असून अनेकजण त्याला भेटण्यासाठी गर्दी करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Nashik News : शिवसृष्टी प्रकल्पाची कामे जलद गतीने पूर्ण करा; छगन भुजबळांच्या सूचना